“अवकारीका” हा स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासावर आधारित भारतातील पहिला चित्रपट आहे. समाजामध्ये विशेषत: शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेचे, पर्यावरणाच्या जतनाचे व जबाबदारीचे भान निर्माण व्हावे या उदात्त हेतूने या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शक सीए अरविंद भोसले यांनी केंद्र सरकारच्या वित्तमंत्री मा. निर्मला सीतारामन यांना थेट मागणी करून जीएसटीमधून सूट द्यावी असे आवाहन केले आहे. अनेक शाळांकडून विद्यार्थ्यांना हा चित्रपट दाखविण्याची मागणी होत आहे. मात्र, चित्रपटावरील जीएसटीमुळे शाळांना व पालकांना खर्चाचा भार पडत आहे.
विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छ भारत – सुंदर भारत आणि पर्यावरणपूरक विचार रुजवण्यासाठी हा चित्रपट मोठ्या प्रमाणावर शालेय स्तरावर प्रदर्शित होणे आवश्यक आहे. शासनाने सामाजिक आणि राष्ट्रीय हित लक्षात घेऊन “अवकारीका” चित्रपटाला जीएसटीतून पूर्ण सूट द्यावी, अशी मागणी दिग्दर्शकांनी व्यक्त केली आहे.
“अवकारीका” चित्रपटाला स्वच्छ भारत अभियान तसेच भारत सरकारच्या शहरी विकास मंत्रालयाकडून सहकार्य मिळाले असून, पिंपरी चिंचवड व पुणे महानगरपालिका यांनीही अधिकृत पाठींबा दिला आहे.