spot_img
spot_img
spot_img

वाकड–ताथवडे परिसरात महापालिकेची अतिक्रमण निर्मूलन मोहीम

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाने विकास आराखड्यात आरक्षित असलेल्या १८ मीटर रस्त्यावरील ४३ झोपड्यांचे सुमारे ३८ हजार ७५० चौरस फुटांवरील बांधकाम निष्कासित केले.

पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंहअतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटीलशहर अभियंता मकरंद निकम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाचे उपायुक्त अण्णा बोदडेमुख्यालय अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त अतुल पाटील यांच्या अधिपत्याखाली करण्यात आलेल्या या कारवाईत कार्यकारी अभियंता सुनिल शिंदे,राजेंद्र शिंदे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने काळाखडकवाकड येथील स. नं. १२४/१ या मिळकतीवरील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेस लागून असलेल्या मंजूर विकास योजनेतील भूमकर चौकवाकड येथील ताथवडे हद्दपर्यंत १८ मी. रस्त्याने बाधित होणाऱ्या २०० मीटर लांब व १८ मीटर रुंद असलेल्या सुमारे ३८ हजार ७५० चौरस फूट क्षेत्रामध्ये ४३ झोपड्या निष्कासित करण्यात आल्या. ड क्षेत्रीय कार्यालय स्थापत्यझोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागप्रशासन व स्थापत्यशहरी दळणवळण विभागनगररचना विभागविद्युत विभागअतिक्रमण विभागअग्निशामक व महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान यांनी संयुक्तपणे ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये सदर रस्ता रुंदीकरणातील अनधिकृत झोपड्या/वीट बांधकाम ड क्षेत्रीय कार्यालय स्थापत्य विभागाच्या ४ पोकलेन्ड४ जेसीबी६ डंपर व २० मजुरांच्या सहाय्याने निष्कासित करण्यात आले.

पिंपरी चिंचवड  महापालिकेच्या विकास योजना आणि सार्वजनिक सुविधांच्या अंमलबजावणीस अडथळा ठरणाऱ्या अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे.  वाकड-ताथवडे परिसरात १८ मीटर रस्त्याला अडथळा ठरणारे अतिक्रमण हटवण्यात आले आहे. सदर रस्त्याचे काम त्वरित सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे या परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.

– शेखर सिंहआयुक्त तथा प्रशासकपिंपरी चिंचवड महापालिका

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!