spot_img
spot_img
spot_img

युवा पिढीने सिक्युरिटी मार्केट क्षेत्रातील करिअरच्या संधींकडे सकारात्मकतेने पाहावे – शुभायु दास

शबनम न्यूज | प्रतिनिधी

युवा पिढीने सिक्युरिटी मार्केट क्षेत्रातील कौशल्ये संपादित करून या क्षेत्रातील करिअरच्या संधींकडे सकारात्मकतेने पाहावे असे मत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटीज मार्केट्स (एनआयएसएम) चे सहाय्यक महाव्यवस्थापक शुभायु दास यांनी व्यक्त केले. चिंचवड येथील यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) च्यावतीने आयोजित परिसंवादात ते बोलत होते. यावेळी त्यांनी सिक्युरिटीज मार्केटचे महत्त्व व आर्थिक जागरूकता याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

विविध उदाहरणांचे दाखले देत शुभायु दास यांनी विद्यार्थ्यांशी अनौपचारिक संवाद साधला.

याप्रसंगी विविध शैक्षणिक उपक्रम संयुक्त विद्यमाने राबविण्यासाठी एनआयएसएम व आयआयएमएस यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.या करारावर एनआयएसएमच्यावतीने सहाय्यक महाव्यवस्थापक शुभायु दास व आयआयएमएसचे संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांनी स्वाक्षरी केली. या सामंजस्य करारामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक-औद्योगिक भागीदारीचे लाभ करिअरसाठी उपयुक्त ठरतील असे आयआयएमएसचे संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांनी सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोमल गौड आणि रिया मिरजकर या विद्यार्थिनींनी केले. तर प्रा. डॉ. मधुरा देशपांडे यांनी आभार प्रदर्शन केले.

एनआयएमएस विषयी :

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटीज मार्केट्स (NISM) ही २००६ मध्ये भारतातील सिक्युरिटीज मार्केट्सचे नियामक असलेल्या सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) द्वारे स्थापन केलेली एक सार्वजनिक ट्रस्ट आहे. ही संस्था सिक्युरिटीज मार्केट्समधील गुणवत्ता मानके वाढवण्याच्या उद्देशाने विविध स्तरांवर क्षमता निर्माण उपक्रमांची विस्तृत श्रेणी राबवते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!