spot_img
spot_img
spot_img

‘मेडिएशन’मुळे न्यायव्यवस्थेवरील भार कमी होण्यासह प्रलंबित खटले निकाली निघण्यास गती मिळेल: डॉ. रेणू राज

सूर्यदत्त आंतरराष्ट्रीय मेडिएशन केंद्र (एसआयएमसी) व रॅडँक्स लिमिटेडच्या वतीने पहिल्या आंतरराष्ट्रीय मेडिएशन प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन
पुणे: “दिवसेंदिवस मेडिएशनचे क्षेत्र विस्तारत असल्याने कुशल आणि प्रमाणित मेडिएटर्सची गरज वाढत आहे. मेडिएटर्सची संख्या वाढली, तर न्यायव्यवस्थेवरील येणारा अनाठायी भार कमी होईल, पक्षकारांचा वेळ, पैसा वाचेल आणि प्रलंबित खटल्यांचे निवारण होण्याला गती मिळेल. त्यामुळे येणाऱ्या काळात ‘मेडिएशन’ क्षेत्रात करिअरच्या मोठ्या संधी निर्माण होतील,” असे प्रतिपादन लंडन येथील रॅडँक्स लिमिटेडच्या संस्थापिका, आंतरराष्ट्रीय मेडिएटर व कायद्याच्या अभ्यासक डॉ. रेणू राज यांनी केले.
सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त इंटरनॅशनल मेडिएशन सेंटर (एसआयएमसी) आणि लंडनमधील रॅडँक्स लिमिटेडच्या यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भारतातील पहिल्या आंतरराष्ट्रीय मेडिएशन प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. रेणू राज बोलत होत्या. बावधन येथील सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या बन्सीरत्न सभागृहात झालेल्या कार्यक्रमावेळी सर्वोच्च न्यायालय मध्यस्थ संघटनेचे अध्यक्ष आर. संथानकृष्णन, संसदेचे निवृत्त संयुक्त सचिव प्रदीप चतुर्वेदी, रॅडँक्स लिमिटेडमधील मेडिएटर आर. पी. मिश्रा, अजय कुमार लाल, विश्वशांती दूत डॉ. सुधीर तारे, कार्यक्रमाचे आयोजक आणि सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, सहयोगी उपाध्यक्ष सिद्धांत चोरडिया, विधी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य केतकी बापट, डॉ. मोनिका सेहरावत, डॉ. सदानंद राऊत आदी उपस्थित होते. सूर्यदत्तच्या मल्टी डीसीप्लिनरी कॅम्पस मधील विविध शाखा जसे कि लॉ, फार्मसी, नर्सिंग, कला वाणिज्य विज्ञान, व्यवस्थापन, सायबर सेक्युरिटी, ऍनिमेशन, हॉटेल व्यवस्थापन, फिजिओ आदींच्या हजारो विद्यार्थी व शिक्षकांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेऊन मेडिएशन अभ्यासक्रमाची माहिती घेतली.
डॉ. रेणू राज म्हणाल्या, “न्यायालयाच्या चकरा मारून, वकिलांना पैसे देऊन लाखो लोक त्रस्त आहेत. वर्षानुवर्षे न्यायालयात प्रलंबित खटले निकाली निघण्यासाठी ‘मेडिएशन’ची भूमिका महत्वाची ठरेल. भारतासह जगभरात ‘मेडिएशन’ अनिवार्य करण्यात येत आहे. न्यायालयात जाण्यापूर्वी मेडिएटरर्सकडे जावे, असा कायदा होत आहे. त्यामुळे ‘मेडिएटर’ म्हणून करिअर घडवण्याची मोठी संधी आहे. कोणत्याही क्षेत्रातील व्यक्ती मेडिएशन करू शकतात. त्यासाठी ‘सूर्यदत्त’च्या सहकार्याने प्रशिक्षण कार्यक्रम आयोजिला आहे. ४५ तासांचे हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर रॅडँक्सच्या वतीने आंतरराष्ट्रीय मान्यतेचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. त्याआधारे जगभरात तुम्हाला कुठेही मेडिएटर म्हणून काम करता येऊ शकते.”
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “सूर्यदत्त येथे मेडिएशन प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यासाठी ऑगस्ट २०२५ मध्ये, सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स आणि रॅडँक्स लिमिटेड (लंडन) यांच्यात एक सामंजस्य करार (एमओयू) झाला होता. या सहकार्याचे पुढील पाऊल म्हणून, सूर्यदत्त इंटरनॅशनल मेडिएशन सेंटर (एसआयएमसी) येथे हा ‘मेडिएशन ट्रेनिंग’ अभ्यासक्रम आयोजिला आहे. भारतीय तरुणांना जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त मेडिएटर होण्यासाठी हा कार्यक्रम महत्त्वाचा आहे. भारतातील पहिला अभ्यासक्रम ‘सूर्यदत्त’मध्ये घेण्याची संधी दिली, याबद्दल ‘रॅडँक्स’चे आभार मानतो. या नाविन्यपूर्ण क्षेत्रात तरुणांना, नोकरदारांना, तज्ज्ञांना प्रमाणित व कुशल मेडिएटर होण्याची संधी आम्ही देऊ इच्छित आहोत.”
 
भारतीय मेडिएशन कायदा २०२३ अंतर्गत भारतीय मेडिएटर्स परिषद अस्तित्वात आल्यावर भारतातही मेडिएटर म्हणून काम करण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी ऍक्रिडिएशन कोर्स पूर्ण करावा लागणार आहे. सूर्यदत्त विधी महाविद्यालयाच्या बीएलएलबी आणि बीबीएलएलबीच्या तृतीय व चतुर्थ वर्षाच्या व एलएलबीच्या प्रथम व द्वितीय वर्ष्याच्या विद्यार्थ्यांना हा फाउंडेशन प्रोग्राम अत्यंत माफक दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामध्ये सर्व पात्र विद्यार्थ्यांची ४५ तासांच्या पुढील प्रशिक्षणासाठी निवड होणार आहे, असेही डॉ. रेणू राज यांनी नमूद केले.
आर. संथानकृष्णन म्हणाले की, मेडिएशन ही काळाची गरज असून ती पक्षकारांचा वेळ व पैसा वाचवून त्यांना वेळेत न्याय मिळवून देण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे. न्यायालयांवरील प्रचंड खटल्यांचा भार कमी करण्यासाठी ही एक प्रभावी पर्यायी न्यायनिवाडा यंत्रणा ठरत असून, प्रक्रियेतील गोपनीयता व विश्वासार्हता यामुळे पक्षकारांचा परस्पर विश्वास अधिक दृढ होतो. कौटुंबिक तसेच व्यावसायिक वादांमध्ये तणाव न वाढवता तोडगा काढण्यास मदत होते आणि संबंध टिकवून ठेवण्यासही ही पद्धत उपयोगी ठरते. आंतरराष्ट्रीय स्तरावर मेडिएशनला प्राधान्य मिळाले असून भारतातही ती वेगाने स्वीकारली जात आहे. प्रशिक्षित व प्रमाणित मेडिएटर्स तयार झाल्यास न्यायव्यवस्थेतील बदलाला गती मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.
प्रदीप चतुर्वेदी म्हणाले, “देशात अनेक छोटे-मोठे वाद मोठ्या प्रमाणात न्यायालयांमध्ये, ग्राहक मंचाकडे, हरित लवादाकडे प्रलंबित आहेत. कायद्याच्या कचाट्यात अडकलेले हे खटले लवकर मार्गी लागावेत, त्यातून सुटका होऊन वादी व प्रतिवादी या दोन्ही पक्षकारांना दिलासा मिळावा, त्यांचा वेळ व पैसा वाचावा, यासाठी मेडिएशनचा मार्ग अवलंबला गेला पाहिजे. जगभरात मेडिएटर्सची मोठी गरज आहे. भारतातही मेडिएशनचा कायदा पारित झाला आहे. सर्टिफाईड मेडिएटर्सची संख्या वाढणे गरजेचे आहे. ‘सूर्यदत्त’ व रॅडँक्स लिमिटेड या दोन्ही संस्थांच्या पुढाकारातून प्रमाणित व चांगल्या मेडिएटर्सची मोठी फळी उभी राहील.”
 
प्रा. केतकी बापट म्हणाल्या, “सूर्यदत्त हे नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात अग्रणी राहिले आहे. उदयोन्मुख क्षेत्रात सूर्यदत्त हे ट्रेंडसेटर म्हणून नावाजलेले आहेसंस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या दूरदृष्टीमुळे अनेक उपक्रम शैक्षणिक क्षेत्रात प्रवर्तक म्हणून रुजवले गेले. विविध क्षेत्रांतील दिग्गजांना कॅम्पसमध्ये आमंत्रित करण्याचा अभिनव उपक्रमही सूर्यदत्तही अग्रणी शैक्षणिक संस्था करते. त्यातून विद्यार्थ्यांना वैविध्यपूर्ण ज्ञानार्जन करण्याची संधी मिळते.”
 
“बीएस्सी सायबर सिक्युरिटी हा अभ्यासक्रम पहिल्यांदाच सूर्यदत्तमध्ये सुरू करण्यात आलायाचबरोबर क्षेत्रनिहाय विशेष अभ्यासक्रमसूर्यदत्त ग्लोबल आर्मीसमर्पण कार्यक्रमांची मालिकाअन्नबँकउत्पादन बँकज्ञानबँकध्यानशिबिरेचिंतनमनन उपक्रममोबाईल व लॅपटॉपला सुट्टी हा अभिनव उपक्रम तसेच मूकवाचन व रीडॅथॉन आदी उपक्रमांची सुरुवात सूर्यदत्तने केली आहे,” असे डॉमोनिका सेहरावत यांनी नमूद केले. डॉ. सुधीर तारे, आर. पी. मिश्रा, अजय कुमार लाल यांनीही मनोगते व्यक्त केली. ग्रीष्म सुराणा, चिन्मय सूळ, अल्फीया मुलानी यांनी सूत्रसंचालन केले.
१ : सूर्यदत्त इंटरनॅशनल मेडिएशन सेंटर (एसआयएमसी) आणि लंडनमधील रॅडँक्स लिमिटेडच्या यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भारतातील पहिल्या आंतरराष्ट्रीय मेडिएशन प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी दीपप्रज्वलन करताना डावीकडून प्राध्यापिका डॉ. मोनिका सेहरावत, सहयोगी उपाध्यक्ष सिद्धांत चोरडिया, मेडिएटर अजयकुमार लाल, विश्वशांती दूत डॉ. सुधीर तारे, सल्लागार डॉ. सदानंद राऊत, मेडिएटर आर.पी. मिश्रा, ‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, रॅडँक्स लिमिटेडच्या संस्थापिका डॉ. रेणू राज, प्राचार्य प्रा. केतकी बापट, माजी संसदीय सचिव प्रदीप चतुर्वेदी व सर्वोच्च न्यायालयाच्या मेडिएशन कमिटीचे अध्यक्ष आर. संथानकृष्णन.
२ : सूर्यदत्त इंटरनॅशनल मेडिएशन सेंटर (एसआयएमसी) आणि लंडनमधील रॅडँक्स लिमिटेडच्या यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भारतातील पहिल्या आंतरराष्ट्रीय मेडिएशन प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटनप्रसंगी सामंजस्य करार करताना ‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया व रॅडँक्स लिमिटेडच्या संस्थापिका डॉ. रेणू राज. यावेळी उपस्थित ‘सूर्यदत्त’च्या उपाध्यक्ष सुषमा चोरडिया, माजी संसदीय सचिव प्रदीप चतुर्वेदी व विश्वशांती दूत डॉ. सुधीर तारे.
३: सूर्यदत्त इंटरनॅशनल मेडिएशन सेंटर (एसआयएमसी) आणि लंडनमधील रॅडँक्स लिमिटेडच्या यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भारतातील पहिल्या आंतरराष्ट्रीय मेडिएशन प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटनप्रसंगी डावीकडून प्राचार्य प्रा. केतकी बापट, मेडिएटर अजयकुमार लाल, ‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, रॅडँक्स लिमिटेडच्या संस्थापिका डॉ. रेणू राज, सर्वोच्च न्यायालयाच्या मेडिएशन कमिटीचे अध्यक्ष आर. संथानकृष्णन, माजी संसदीय सचिव प्रदीप चतुर्वेदी, मेडिएटर आर. पी. मिश्रा, विश्वशांती दूत डॉ. सुधीर तारे, डॉ. मोनिका सेहरावत आदी.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!