शबनम न्यूज | प्रतिनिधी
मुंबई – बंगळुरू महामार्गावर अन्न आणि औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. अवैधरित्या २६ लाखांचा गुटखा घेऊन जाणाऱ्या ट्रकला पकडलं आहे. महाराष्ट्रात गुटखा बंदी आहे. तरी देखील अशा छुप्या पद्धतीने गुटखा विकला जात असल्याच निदर्शनास आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई- बंगळुरू महामार्गावरून अवैधरित्या गुटखा घेऊन जाणार असल्याची गुप्त माहिती अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकाला मिळाली होती. संशयित ट्रक थांबवून झडती घेण्यात आली. ट्रकमध्ये विविध कंपनीचा गुटखा आढळला असून त्याची किंमत तब्बल २६ लाख रुपये आहे. हा गुटखा कर्नाटकहून मुंबईकडे जात होता. महाराष्ट्रात गुटखा बंदी आहे. त्यामुळं छुप्या पद्धतीने गुटखा घेऊन जाण्यात येत होता.ही मोठी कारवाई मानली जात आहे.