शबनम न्यूज | प्रतिनिधी
माजी नगरसेविका श्रीमती अनुराधाताई गोरखे यांच्या वाढदिवसानिमित्त कलारंग कला संस्थान, पिंपरी चिंचवड यांच्या वतीने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात प्रा.गणेश शिंदे यांचे “जीवन सुंदर आहे” या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान होणार असून, पालक, विद्यार्थी, गृहिणी व जेष्ठ नागरिकांनी हे व्याख्यान आवर्जून ऐकावे असे व्याख्यान आहे. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात गुणवंत विद्यार्थींचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला असून, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव आमदार अमित गोरखे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या मनोबलात भर घालणारा आणि त्यांना नवीन दिशा देणारा ठरणार आहे. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण असून, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी ठरेल, असे आयोजकांचे मत आहे.
बुधवार, दि. १० सप्टेंबर २०२५ रोजी सायं. ४.३० वा. साई गार्डन, संभाजीनगर, चिंचवड या ठिकाणी सदर कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला विविध मान्यवर उपस्थित राहणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन कलारंग कला संस्थान, पिंपरी चिंचवड यांच्या वतीने करण्यात आले आहे.