एसबीपीआयएम मध्ये “एआय फॉर टीचर्स” प्रशिक्षण कार्यशाळा
पिंपरी, पुणे (दि. ०९ सप्टेंबर २०२५) ‘एआय’चा उपयोग करून अवघड आणि अती क्लिष्ट विषयाचे सहज, सुलभ विश्लेषण करणे शक्य आहे. विविध प्रकारचे टूल वापरून अभियांत्रिकीशिवाय इतर अभ्यासक्रमातही शिक्षकांनी याचा वापर केला पाहिजे. पुढील काळात एआय मुळे अध्यापन अधिक परिणामकारक होईल असे मत ‘ए कन्सल्टन्सी’चे सहसंस्थापक डॉ. अमेय पांगारकर यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचलित एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या कर्मचारी विकास समितीच्या वतीने “एआय फॉर टीचर्स” या विषयावर प्राध्यापकांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी एसबीपीआयएम च्या संचालिका डॉ. किर्ती धारवडकर, कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. योगेंद्र देवकर, डॉ. काजल महेश्वरी, डॉ. अमरीश पद्मा, डॉ. हीना आदींसह एमबीए चे सर्व प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.
अध्यापन पद्धती अधिक परिणामकारक व आकर्षक करण्यासाठी एआयचा वापर कसा करता येईल, याचे व्यवहार्य मार्गदर्शन शिक्षकांना मिळाले पाहिजे. यासाठी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले आहे. यामुळे प्राध्यापकांना शैक्षणिक कार्यात नवे तंत्रज्ञान आत्मसात करण्याची प्रेरणा मिळेल. अध्यापन प्रक्रियेत अधिक गुणवत्ता व नाविन्य आणण्यास हा कार्यक्रम उपयुक्त ठरेल असे एसबीपीआयएम च्या संचालिका डॉ. किर्ती धारवडकर यांनी सांगितले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.