शबनम न्यूज | प्रतिनिधी
रोटरी ही देशभरातील च नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरांवर सामाजिक कामे करणारी एनजीओ आहे. परंतु या रोटेरियंस मध्ये कितीतरी गुणी कलाकार दडलेले आहेत. त्यांना एक हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न “रोटरीचे इंद्रधनु” या कार्यक्रमाद्वारे पुणे फेस्टिवल मध्ये करण्यात आला.
पुणे फेस्टिवल मध्ये “रोटरीचे इंद्रधनु” या कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी प्रमाणे यंदाही करण्यात करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या वेळी बालगंधर्व कार्यक्रम प्रमुख मोहन टिल्लू यांनी प्रास्ताविक केले.
पुणे फेस्टिवल चे मुख्य संयोजक अॅड. अभय छाजेड यांचे हस्ते रोटरी डिस्ट्रिक्ट 3131चे प्रांतपाल रो.संतोष मराठे, फर्स्ट लेडी तनुजा मराठे तसेच पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर पंकज शहा यांचा सन्मान करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना रो. संतोष मराठे यांनी रोटरी ने जगभरात सध्या चालवलेले विविध प्रकल्प व समाज उपयोगी कामे यासंदर्भात माहिती दिली .पुणे फेस्टिवल चे मुख्य संयोजक अॅड. अभय छाजेड यांनी रोटरी कार्याचे कौतुक करत “रोटरीचे इंद्रधनु” हा कार्यक्रम करण्याची गरज व उपयोग याबाबतची पुणे फेस्टिवलची भूमिका मांडली. पुणे फेस्टिवलचे अध्यक्ष मा.सुरेश कलमाडी यांच्या मार्गदर्शनाने रोटरी समवेत केलेल्या सामाजिक उपक्रमांच्या आठवणींना देखील उजाळा दिला.
यानंतर पुण्यामध्ये असलेल्या विविध रोटरी क्लब मधील गायक गायिका यांनी गाणी सादर केली . तसेच समूहनृत्य व विडंबनात्मक नाट्यरचना( skits) देखील सादर केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रो. हेमा बेल्लड यांनी केले. रो. उर्मिला हळदणकर यांनी आभार मानले. पुणे फेस्टिवलचे अतुल गोंजारी व श्रीकांत कांबळे यांनी व्यवस्थापन केले.