पिंपरी चिंचवड ( प्रतिनिधी ) : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून २३ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या मध्ये प्रामुख्याने थेरगाव येथील बालवाडी विभागातील यशवंतराव चव्हाण उर्दू शाळा मधील नसरीन बानो मोहम्मद सुलतान आणि थेरगाव उर्दू पब्लिक स्कूलच्या उस्ताद बिबिहाजारा जंगबहादूर यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.आमदार अमित गोरखे, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, तृप्ती सांडभोर यांच्या प्रमुख उपस्थितीत चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात हा कार्यक्रम पार पडला.
उर्दू प्राथमिक शाळेच्या उस्ताद बीबी हाजरा जंगबहादूर या उपशिक्षिका या पदावर कार्यरत आहेत, मागील 19 वर्षापासून त्या शिक्षकांमधून सेवेत आहेत. शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याची वैयक्तिक प्रगती कशी व्हावी यासाठी त्या नेहमी प्रयत्नशील असतात. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाबाबत प्रोत्साहित करत असतात. त्याचबरोबर आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्यासाठी त्या नेहमी प्रयत्नशील असतात, याचबरोबर शिष्यवृत्ती परीक्षेत प्रत्येक विद्यार्थी हा पात्र ठरावा यासाठी त्या नेहमी प्रयत्नशील असतात त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
याचबरोबर बालवाडी विभागातील उर्दू शाळेच्या शिक्षिका नसरीन बानो मोहम्मद सुलतान यांनाही आदर्श शिक्षिका म्हणून महापालिकेच्या वतीने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्या 2004 पासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत, मागील 22 वर्षापासून सातत्याने लहान मुलांना शिक्षण देण्याचे कार्य त्या करण्यात आले आहेत. बालवाडी वर्गाचा विद्यार्थीपट वाढविण्यासाठी परिसरात सर्वे करणे, पटसंख्या वाढविणे यासाठी त्या नेहमी प्रयत्नशील असतात तसेच लहान मुलांना शिकवण्याची त्यांची पद्धत उल्लेखनीय आहे.लहान बालकांना शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी त्या विविध खेळाच्या माध्यमातून मुलांना शिकविण्याचा प्रयत्न करतात, प्रत्येक वर्षी बालवाडीची पटसंख्या ही 100 विद्यार्थ्यांपेक्षा पुढे नेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो त्यांच्या याच कार्याची दखल घेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने त्यांना आदर्श शिक्षिका या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.पुरस्कार मिळाल्यानंतर या दोघी शिक्षकांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.