शबनम न्यूज | प्रतिनिधी
७ व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये शरीरसौष्ठ स्पर्धेला मोठा प्रतिसाद लाभला पुणे डीस्ट्रीक बॉडी बिल्डिंग असोसिएशेनच्या सहकार्याने झालेल्या या स्पर्धेस ११५ स्पर्धकांनी भाग घेतला होता. सिंहगड रस्त्यावरील राष्ट्र सेवादल हॉल, सानेगुरुजी स्मारक येथे ही स्पर्धा पार पडली. स्पर्धेत एकूण ८ गट होते.
पुणे डीस्ट्रीक बॉडी बिल्डिंग असोसिएशेनचे राजेंद्र नागरे हे या स्पर्धेचे समन्वयक होते. स्पर्धेचा बक्षीस वितरण पुणे फेस्टिव्हलचे मुख्य समन्वयक अॅड. अभय छाजेड यांच्या हस्ते पार पडला यावेळी पुणे फेस्टिव्हलचे क्रीडा समितीचे समन्वयक प्रसन्न गोखले आणि अॅड. प्रवीण करपे उपस्थित होते.
या स्पर्धेसाठी प्रशांत जगताप, विनोद नायडू, मुस्तफा परे, सागर येवले, नवनाथ शिंदे, गौतम तांबे, दिलीप घुमाळ, राजेंद्रनांगरे यांनी पंच म्हणून काम पाहिले.
स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे :
पुणे फेस्टीव्हल श्री = २०२५
अपकमिंग बॉडी बिल्डर विजेता
शुभम मिसाळ
पुणे फेस्टीव्हल श्री – २०२५-
मोस्ट इम्प्रूव्हड बॉडी बिल्डर विजेता
अक्षय वाडीकर
पुणे- फेस्टीव्हल श्री-२०२५चा विजेता.
आकाश दडमल