पिंपरी चिंचवड शहरातील आम आदमी पक्षाच्या माजी महिला शहराध्यक्ष तथा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष मीनाताई चंद्रमणी जावळे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. 31 ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता खाजगी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मावळली.अंत्यविधी दुपारी तीन वाजता अमरधाम समशान भूमी निगडी येथे होणार आहे
मागील काही दिवसापासून मीनाताई जावळे या आजारी होत्या त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते परंतु मृत्यूशी झुंज देताना त्यांना अपयश आले.
त्यांच्या मागे त्यांचे पती आम आदमी पक्षाचे सांस्कृतिक विभागाचे शहराध्यक्ष चंद्रमणी जावळे, मुलगी व मुलगा असा परिवार आहे.