पिंपरी चिंचवड शहरातील मोशी परिसरात गणेशोत्सवानिमित्त अण्णासाहेब मगर सहकारी बँक मर्यादित भोसरी चे मा. चेअरमन प्रा.राजेश सस्ते यांनी गणेश उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी अनेक गणेश मंडळांना भेटी दिल्या . सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. या मध्ये प्रामुख्याने हार्दिक इम्पल्स सोसायटी शिवाजीवाडी ,शिवकलासिक सोसायटी शिवाजीवाडी ,केसर ट्रीटउन सोसायटी शिवाजीवाडी, पावन गणपती मित्र मंडळ शिवाजीवाडी,वक्रतुंड मित्र मंडळ आदर्श नगर, मोरया मित्र मंडळ आदर्श नगर येथे प्रा. राजेश सस्ते यांच्या हस्ते गणेश आरती करण्यात आली. या वेळी गणेश आरतीचा मान मिळाल्याचा आनंद.आरतीचा मंगल सुर आणि बाप्पाच्या चरणी वाहिलेली भक्ती यासाठी प्रा.राजेश सस्ते यांनी मनःपूर्वक आभार.व्यक्त करत सर्वांच्या घरात सुख, शांती, समृद्धी नांदो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. अशा शब्दात या गणेशोत्सवानिमित्त आपल्या परिसरातील, आपल्या प्रभागातील सर्व कुटुंबियांना नागरिकांना युवकांना शुभेच्छा दिल्या. मोशी परिसरातील युवा वर्गात आदरणीय स्थान असलेले व्यक्तिमत्व म्हणून प्रा. राजेश सस्ते हे प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या म्हणून त्यांनी आपला नावलौकिक कायम ठेवला आहे. प्रा. राजेश सस्ते हे नेहमी विविध उपक्रम राबवित असतात.