spot_img
spot_img
spot_img

आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते श्री गणरायाची आरती

पिंपरी चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाच्या वतीने गणेशोत्सवाचे आयोजन

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव उत्साह, भक्तीभाव आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत साजरा करण्यास सुरुवात झाली आहे. येथे आज सायंकाळी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते श्री गणरायाची विधिवत आरती करण्यात आली. यावेळी “गणपती बाप्पा मोरया” च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, सहशहर अभियंता बापू गायकवाड, उपायुक्त अण्णा बोदडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, महापालिका कर्मचारी महासंघाचे उपाध्यक्ष मनोज माछरे, खजिनदार नितीन सनगीर यांच्यासह सनी कदम, विशाल भुजबळ, अभिषेक फुगे, विश्वनाथ लांडगे, दत्ता ढगे, ईश्वर आठवल, गणेश जाधव, विजया कांबळे, माया वाकडे, शितल पवार, योगिता पाटील यांच्यासह महापालिका अधिकारी, कर्मचारी व महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, गणेशोत्सवाच्या निमित्ताने कर्मचारी महासंघाच्या वतीने विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये २९ ऑगस्ट २०२५ रोजी श्री गणपती अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय गणरायाच्या मूर्ती विसर्जनावेळी पर्यावरणपूरक उपक्रम राबवले जाणार असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!