spot_img
spot_img
spot_img

गांधीपेठ तालीम मित्रमंडळाच्या गणेशोत्सवात महिलांचे अथर्वशीर्ष पठण

शबनम न्यूज | प्रतिनिधी

भाद्रपद शुद्ध पंचमी अर्थात ऋषिपंचमी, शेगावीचा राणा श्री गजाननमहाराजांची पुण्यतिथी आणि कलावतीदेवी यांची जयंती या मंगलदिनांचे औचित्य साधून, दोन्ही गुरूंना वंदन करून गांधीपेठ महिला मंडळात गणपती बाप्पाचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण मंगलदायी वातावरणात संपन्न झाले.

अथर्वशीर्ष पठणाची सुरुवात कस्तुरी जमखंडी आणि प्रभावती इंदलकर यांनी केली. गणपतीसाठी शंखवादन सेवा आणि अथर्वशीर्ष आरती सविता दुमडे, प्रांजली पानसे यांनी केली. अथर्वशीर्ष पठणास गांधीपेठ महिला मंडळातील माया थोरात, शैला जमखंडी, रेश्मा जमदाडे, अश्विनी थोरात, कविता गोलांडे, सुजाता गोलांडे, चंद्रकला शेडगे, रत्नमाला बोरकर, मंगल नेवाळे, सिद्धी नेवाळे, हेमा सायकर, मंदाकिनी चोपडे, मंडळाच्या अध्यक्ष गीतल गोलांडे आणि गांधी पेठ महिला मंडळाच्या अन्य सभासद अशी सुमारे पन्नास महिलांची याप्रसंगी उपस्थिती होती.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!