पिंपरी चिंचवड : (रहाटणी प्रतिनिधी) गणेशोत्सवाच्या वातावरणात सर्वत्र उत्साह आहे.सर्वत्र गणेश जयंती निमित्त विविध उपक्रम साजरे होत आहे. गणरायाची आरती मोठ्या उत्साहाने होत आहेत परंतु अशावेळी वारंवार वीज खंडित होणे , गणेशोत्सवाच्या काळातच वारंवार वीज खंडित होणे खूप त्रासदायक ठरत आहे. हा वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी सागर कोकणे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. रहाटणी परिसरात अंबिका कॉलनी, शिवशक्ती कॉलनी , स्वामी समर्थ कॉलनी , वेणाई कॉलनी, सिद्धीविनायक कॉलनी , अष्टविनायक कॉलनी , आझाद कॉलनी, जय भवानी चौक परिसर या परिसरात मागील तीन दिवसापासून वारंवार वीज खंडित होत आहे. सदर परिसरात कायमस्वरूपी वीज पुरवठा सुरळीत करा. काही दुरुस्तीची कामे असेल तर ती त्वरित करा व वारंवार होणारे वीज खंडित होऊ नये यासाठी कायमची उपाययोजना करा. अशी मागणी माजी स्वीकृत नगरसेवक सागर खंडू शेठ कोकणे यांनी महावितरण विभाग, पिंपळे सौदागर यांच्याकडे केली आहे.