spot_img
spot_img
spot_img

अरुण पाडुळे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या १० नेमबाजांची पदकांसह गोव्यात पूर्व राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत स्वामी विवेकानंद क्रिडांगण, कृष्णानगर येथे पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत कार्यरत अरुण पाडुळे स्पोर्ट्स प्रमोशन फाउंडेशनच्या नेमबाजी प्रशिक्षण केंद्रातील तब्बल १० नेमबाजांची गोवा येथे होणाऱ्या पूर्व राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी निवड झाली असून, यामध्ये एक रौप्य पदकासह ही निवड अधिकच उल्लेखनीय ठरली आहे. राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धा नुकतीच शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, बालेवाडी, पुणे येथे पार पडली, तसेच कॅप्टन इजिकल स्पर्धा मुंबई येथे पार पडली महाराष्ट्र रायफल असोसिएशनच्या वतीने आयोजित या स्पर्धेत अरुण पाडुळे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या खेळाडूंनी अत्युच्च कामगिरी करत आपल्या नेमबाजी कौशल्याची चमक दाखवली.

निवड झालेल्या खेळाडूंमध्ये खालील नेमबाजांचा समावेश आहे, श्रवण भगत, स्वरा जाधव, महेश पाडुळे (रौप्य पदक विजेते), अर्शद संदे,ज्ञानदा बुटे, ,साईराज गव्हाणे, सई मंडलिक, राजवीर साकोरे,प्रियांश मिर्धा
या यशाचे श्रेय प्रमुख प्रशिक्षक अरुण पाडुळे सर व प्रशिक्षिका भक्ती नारायणकर यांच्या कुशल मार्गदर्शनास जाते. मागील १० महिन्यांपासून सुरू झालेल्या या प्रशिक्षण केंद्राने अल्पावधीतच मोठा टप्पा गाठला आहे.

ही निवड केवळ संस्थेसाठी नव्हे तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रासाठीही अत्यंत गौरवाची बाब आहे. एकाच वेळी इतक्या खेळाडूंनी पूर्व राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरणे ही पिंपरी चिंचवड शहराच्या नेमबाजी इतिहासातील पहिलीच घटना आहे. सर्व स्तरातून या खेळाडूंचे व प्रशिक्षकांचे अभिनंदन होत असून, भविष्यात हे खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नक्कीच नाव कमावतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!