तर.. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत एकहाती सत्ता !
शबनम न्यूज | प्रतिनिधी
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मावळ तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या कामाचा आढावा घेत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तालुक्यात सुरू असलेली विकासकामे आणि पक्षाची ध्येय धोरणे घराघरापर्यंत पोचवा, असे आवाहन आमदार सुनील शेळके यांनी केले.
वडगाव मावळ येथे शासकीय विश्रामगृहाचे आवारात झालेल्या मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, ज्येष्ठ नेते गणेशअप्पा ढोरे, विठ्ठलराव शिंदे, काळूराम मालपोटे, लक्ष्मणराव बालगुडे, भरत येवले, नारायण पाळेकर, दीपक हुलावळे, नारायण ठाकर, पंढरीनाथ ढोरे, शहराध्यक्ष सुरेश धोत्रे, प्रवीण झेंडे, रवी पोटफोडे, प्रवीण ढोरे, युवकचे तालुकाध्यक्ष किशोर सातकर, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष सुवर्णा राऊत, कार्याध्यक्षा कल्याणी काजळे, ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष वर्षा नवघणे, शहराध्यक्ष शैलजा काळोखे, पद्मावती ढोरे, युवतीच्या तालुकाध्यक्ष तेजस्विनी गरुड, सहकारसेलचे तालुकाध्यक्ष दिलीप ढोरे, अल्पसंख्यांक महिला सेल अध्यक्षा शबनम खान, विद्यार्थी सेल अध्यक्ष सुशांत बालगुडे आदींसह सर्व सेलचे अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार सुनील शेळके यांनी याप्रसंगी पक्षाचे तालुका कार्यकारिणी तसेच सर्व सेलचे पदाधिकारी, विभाग अध्यक्ष, शहराध्यक्ष, कार्याध्यक्ष यांच्याकडून पक्षाच्या कामाचा आढावा ऐकून घेतला. प्रत्येक पदाधिकाऱ्याने जबाबदारीने पक्षाचे काम केले पाहिजे, ज्यांना काम न करता पदे अडवून ठेवायची आहेत त्यांनी स्वतःहून थांबावे अशी सूचनाही केली. सहकार विभाग, शासकीय कमिटी आदी ठिकाणी संधी दिल्या त्या कार्यकर्त्यांनी पक्षाचे काम निष्ठेने केले पाहिजे, पदे दिली आणि काम मात्र करत नाही असे चालणार नाही अशी ताकीदही दिली.
विरोधकांवर हल्लाबोल !
यावेळी बोलताना आमदार सुनील शेळके यांनी विरोधकांवरही निशाणा साधला, तळेगाव दाभाडे नगरपरिषद साठी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून मी भाजपच्या कार्यकर्त्यांचे नाव घेतले तर विरोधकांनी राष्ट्रवादीकडे उमेदवार नाही म्हणून मी भाजपच्या कार्यकर्त्यांचे नाव घेतले असा आरोप केला. विरोधकांनी नाव जाहीर करावे आणि पुन्हा एकदा आजमावून बघावे असे थेट आव्हान विरोधकांना केले.
यावेळी बोलताना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीच्या माध्यमातूनच लढण्याचा पुनरुच्चार करत ही महायुती विधानसभा निवडणुकीप्रमाणे असेल असेही सांगितले व अशा पद्धतीने एकत्र लढलो तर जिल्हापरिषद, पंचायत समिती, लोणावळा, तळेगाव दाभाडे नगरपरिषद, वडगाव नगरपंचायत निवडणुकीत एकहाती सत्ता येईल असा ठाम विश्वास व्यक्त करत विजयी उमेदवारांची संख्याही जाहीर केले.