साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि कलारंग सांस्कृतिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, २४ ऑगस्ट रोजी चिंचवड येथील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात ‘द फोक परंपरा’ या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्राच्या लोककलेचा आणि सामाजिक चळवळीचा मानबिंदू असलेल्या लोकशाहीरांच्या कार्याला वंदन करण्यासाठी आयोजित या सोहळ्याला खासदार श्रीरंग बारणे, आमदार आश्विनी जगताप, आमदार उमा खापरे, आणि भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्यासह अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर आणि आण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष बाळासाहेब रसाळ, श्री अनिल सौंदळे यांच्याशिवाय शहरातील विविध राजकीय, सामाजिक व औद्योगिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*यावेळी निमंत्रक म्हणून आमदार अमित गोरखे यांनी,
सर्वप्रथम साता समुद्र पार छत्रपती शिवाजी महाराजांना पोहोचवण्याचे काम साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या पोवाड्यातून रशिया येथे केले, तसेच
हा कार्यक्रम समाजात जागृती निर्माण करण्यासाठी आणि अण्णा भाऊ साठे यांचे कार्य समाजामध्ये रुजवण्यासाठी यापुढे दरवर्षी आयोजित करण्यात येईल, असे सांगितले. तसेच खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले की, अण्णा भाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ मिळवून देण्यासाठी लोकसभेत सर्वात आधी त्यांनी आवाज उठवला होता, आणि पुढील काळातही यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहेत. याशिवाय बार्टीच्या अधिकारी इंदिरा अस्वारे यांनी यांनी सांगितले की, आण्णा भाऊ साठे यांचे विचार त्यांचे कार्य समाजातील तळागाळा पर्यंत पोहचवण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित केला आहे.*
आपल्या भाषणांतून प्रमुख पाहुण्यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या क्रांतिकारी जीवनकार्यावर, त्यांच्या साहित्यातील उपेक्षित समाजाच्या वेदनांवर आणि ‘जग बदल घालूनी घाव’ या त्यांच्या सामाजिक परिवर्तनाच्या संदेशावर भाष्य केले. या सोहळ्याचा मुख्य उद्देश लोकसाहित्य आणि लोककलांच्या समृद्ध परंपरेचे जतन करणाऱ्या कलाकारांचा गौरव करणे हा होता. याप्रसंगी साहित्य आणि कला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या श्री. तुकाराम पाटील, श्री. राज अहिरराव, श्री. तानाजी एकोंडे, श्री. धनंजय भिसे आणि सौ. शामला पंडित या मान्यवरांना त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम 5000 प्रत्येकी देऊन गौरविण्यात आले. याव्यतिरिक्त, महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षण घेणारी आणि जर्मनीतील प्रतिष्ठित युनायटेड वर्ल्ड कॉलेजमध्ये (UWC) उच्चशिक्षणासाठी निवड झालेली विद्यार्थिनी श्रावणी टोनगे हिचा देखील विशेष सत्कार करण्यात आला,11 हजार रु रोख व स्मृती चिन्ह देण्यात आले,ज्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला.
पुरस्कार वितरणानंतर सादर झालेल्या लोककलांच्या फोक परंपरा ह्या अप्रतिम सादरीकरणामुळे प्रेक्षागृहातील वातावरण उत्साहाने भारून गेले होते. हा कार्यक्रम केवळ एका जयंतीचा सोहळा नसून, लोकशाहीरांच्या कार्याचा आणि विचारांचा सन्मान करून, लोककला व लोकसाहित्य ही समृद्ध परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची एक चळवळ होती, ज्यामुळे सामाजिक समता आणि एकतेचा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामध्ये प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे ,राजेश पिल्ले,नगरसेविका अनुराधा गोरखे,राजू दुर्गे,शर्मिला बाबर,कमल घोलप,वैशाली काळभोर, भाजपा महिला उपाध्यक्षा सुप्रिया चांदगुडे, तसेच नगरसेवक शीतल शिंदे, सुजाता पालांडे, जयश्री गावडे आणि नगरसेवक राजेंद्र बाबर, संदीप वाघेरे,अमित गावडे, संदीपान झोंबाडे,तसेच
बापू घोलप, कैलास कुटे, नेताजी शिंदे,राजेश अडसूळ, यांचा समावेश होता. तसेच भाजपा उद्योग आघाडी अध्यक्ष अतुल इनामदार, स्वीकृत नगरसेवक संजय कणसे, तसेच गणेश वाळुंजकर, बाळासाहेब शिंदे, दत्ता देवतरासे, काळुराम पवार आणि गणेश लंगोटे ,मनिषा शिंदे,मनोज तोरडमल,भाऊसाहेब अडगळ,आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार श्री धनंजय खुडे यांनी मांडले…