शबनम न्यूज | प्रतिनिधी
सार्वजनिक गणेश उत्सवानिमित्त वनदेव आनंदवन मित्र मंडळ थेरगाव यांच्या वतीने लहान मुलांसाठी मोफत बाल जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच थेरगाव परिसरातील महिला पुरुष व होतकरू तरुणांसाठी भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन येत्या 28 ऑगस्ट 2025 ते 5 सप्टेंबर 2025 पर्यंत करण्यात आले आहे. यादरम्यान आर जे प्रशांत गाडेकर प्रस्तुत ‘खेळ मनोरंजनांचा’ या कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये लहान मुले, महिला भगिनी व ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध मनोरंजनाच्या खेळाचे आयोजन होणार आहे.
त्याच प्रमाणात येत्या शनिवारी दिनांक 6 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी सात ते रात्री बारा पर्यंत गणेश उत्सवानिमित्त पारंपारिक मिरवणूक सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. सदर सोहळा थेरगाव फाटा ते थेरगाव गावठाण दरम्यान होणार आहे. सदर कार्यक्रम कै. मोरू महादू बारणे क्रीडांगण, वनदेव नगर, आनंदवन सोसायटी, थेरगाव, पुणे येथे होणार आहे.
या सर्व कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक अभिषेक गोविंद बारणे मित्रपरिवार यांच्या वतीने करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त बालकांनी, तरुण-तरुणींनी, महिला भगिनींनी तसेच जेष्ठ नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.