spot_img
spot_img
spot_img

मराठ्यांना आरक्षण नाहीच – मनोज जरांगे

२९ ऑगस्टला चलो मुंबईची घोषणा

शबनम न्यूज | प्रतिनिधी

मराठा आणि कुणबी एकच आहे, हे सरकारने आधी मान्य केले. पण आता आपल्याला आरक्षण दिले जात नाही. हैदराबाद आणि साताऱ्याच्या गॅझेट लागू केल्यानंतर ५८ लाख नोंदी सापडल्या आहेत, मात्र त्यानंतरही मराठ्यांना आरक्षण दिले जात नाही. त्यामुळे मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करावी, देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच २९ जाती ओबीसी आरक्षणामध्ये घेतल्या. त्यांची मागणी नसतानाही त्यांना आरक्षण दिले. पण मराठ्यांची मागणी असतानाही मराठ्यांना आरक्षण दिले जात नाही, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला. तसेच जरांगे यांनी २९ ऑगस्टला चलो मुंबईची घोषणा केली.

मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात आता मुंबईत मोर्चा निघणार आहे. यासाठी बीडमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत मराठा समाजाला आरक्षण घेतल्याशिवाय परतायचे नाही, असा निर्धार जरांगे यांनी व्यक्त केला.

मनोज जरांगे म्हणाले, आम्ही शांतपणे मुंबईला जाणार आणि शांततेत मराठा आरक्षण घेणार, समाजावर आलेले संकट मोडून काढणार. मराठा समाजाच्या सभेमध्ये डीजे वाजवू दिला जात नाही. सत्ता येत असते, ती बदलत असते हे लक्षात ठेवा. बीडमध्ये आमच्या सभेमध्ये अडचणी निर्माण केल्या जातात, जरा थांबा, आम्ही मुंबईत येत आहे. त्यावेळी काय करायचे ते करा, असे थेट आव्हान त्यांनी राज्य सरकारला दिले.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस म्हणतात त्यांचा डीएनए ओबीसी आहे, मग शेतकरी ओबीसी नाही का? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची मागणी केली.

 

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!