शबनम न्यूज | प्रतिनिधी
बालरंगभूमी परिषद पुणे जिल्हा आणि पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने आयोजित ‘कै. मनीषा भाऊसाहेब भोईर स्मृती नाट्यछटा स्पर्धा’ आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे बक्षीस वितरण अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी बोलताना भाऊसाहेब भोईर म्हणाले की, या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले सर्वच बालकलाकारांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. त्यांच्या कलेला मिळालेले हे प्रोत्साहन खऱ्या अर्थाने त्यांची कार्याची कलेची पोचपावती आहे. तसेच या स्पर्धेत सहभागी झालेले सर्वच बालकलाकार आणि विजेत्यांचे भाऊसाहेब भोईर यांनी अभिनंदन केले आहे.
याप्रसंगी बालरंग भूमी परिषदेचे उपाध्यक्ष अरुण पटवर्धन, सल्लागार हनुमंत कुबडे, नारायण करपे, प्रा. रामदास थिटे, पुणे जिल्हा शाखा अध्यक्षा दीपाली (माई) शेळके, पिंपरी चिंचवड शाखा अध्यक्षा गौरी लोंढे, अभिनेते डॉ. संजीवकुमार पाटील, मनोज डाळिंबकर, बालकलाकार, पालक वर्ग आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.