शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपळे गुरव येथील काटे पुरम चौकात टोलेजंग असे तीस वर्षांपूर्वीचे वडाचे झाड अखेर उन्मळून पडले. यावेळी एक चार चाकी वाहनाचे मोठे नुकसान झाले. तसेच एक जण गंभीर तर एक महिला किरकोळ जखमी झाल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
यावेळी सांगवी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक तेजश्री म्हैसाळ,अंमलदार एस. डी. कुदळ,सचिन कामले,प्रकाश शिंदे,सांगवी वाहतूक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक राजाराम काकडे,संदीप कुदळ,रहाटणी अग्निशमन दलाचे वाहन,उद्यान विभागाचे वाहन घटनास्थळी दाखल झाले होते.यावेळी जवानांनी,कर्मचाऱ्यांनी धाव घेत अर्ध्या तासात येथील झाडाच्या फांद्या छाटून रस्ता सुरळीत करून देण्यात आला.आमदार शंकर जगताप यांचे स्वीय सहाय्यक गिरीश कांबळे,सामाजिक कार्यकर्ते संजय मराठे,सुरेश सकट,सखाराम रेडेकर यांचे वाहतूक सुरळीत करण्यासाठी मोलाचे सहकार्य लाभले.