spot_img
spot_img
spot_img

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय सेवा केंद्रांमध्ये सुरक्षिततेचा संकल्प!

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्व रुग्णालय आणि वैद्यकीय उपचार केंद्रांमध्ये अग्नितपासणी (फायर ऑडिट) आणि अग्निसुरक्षा नियमपालन प्रमाणपत्र (फायर सेफ्टी कंप्लायन्स सर्टिफिकेट) प्रक्रियेबाबत माहिती देण्यासाठी यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील चाणक्य सभागृहात प्रशिक्षण वर्ग यशस्वीरीत्या पार पडला.

महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंहअतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटीलविजयकुमार खोराटेआरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला. अग्निशमन विभागाचे सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे,  उप अग्निशमन अधिकारी ऋषिकांत चिपाडेसहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी अंजली ढोणे यांनी अग्निसुरक्षाअग्नितपासणीनियमपालन प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आवश्यक प्रक्रिया आणि कायदेशीर तरतुदी अशा विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये अग्निशमन परवानगीपत्र (फायर एनओसी) काढण्यासंदर्भात सविस्तर माहिती प्रशिक्षण कार्यक्रमात देण्यात आली. अग्निशमन परवानगीपत्रासाठी कसा अर्ज करायचायासाठी तयार करण्यात आलेल्या संकेतस्थळावर कोणती आवश्यक कागदपत्रे अपलोड करायचीयाबाबत सहाय्यक आयुक्त ढाकणे व उप अग्निशमन अधिकारी चिपाडे यांनी मार्गदर्शन केले. तसेच ही प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी यासाठी अग्निशमन विभाग आणि वैद्यकीय विभागाचा परस्पर समन्वय कसा असावायाबाबतही माहिती देण्यात आली. तसेच ज्यांनी आधीच अग्निसुरक्षा नियमपालन प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर केले आहेतत्यावरही चर्चा करण्यात आली.

या उपक्रमाद्वारे महापालिका आरोग्यसेवा केंद्रांमध्ये अग्निसुरक्षेची जागरूकता वाढवूनसुरक्षित व नियमपालन करणारी आरोग्यसेवा केंद्रे निर्माण करण्याचा संकल्प करण्यात आला. प्रशिक्षण सत्रात महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व अग्निशमन केंद्रप्रमुख तसेच महापालिकेच्या विविध दवाखान्यांमधील व उपचार केंद्रांमधील डॉक्टरांनी सहभाग घेतला होता.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्यसेवा केंद्रांमध्ये अग्निसुरक्षा ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. अग्नितपासणी व परवानगीपत्र प्रक्रियेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी आम्ही हे प्रशिक्षण आयोजित केले होते. या उपक्रमामुळे डॉक्टर आणि आमच्या विभागामध्ये समन्वय वाढेल आणि सर्व आरोग्य केंद्रे कायदेशीर निकषांचे पालन करून अधिक सुरक्षित होतील.

– उमेश ढाकणेसहाय्यक आयुक्तपिंपरी चिंचवड महापालिका

रुग्णसेवा करणाऱ्या प्रत्येक केंद्रासाठी सुरक्षा ही प्राथमिक जबाबदारी आहे. अग्निसुरक्षा नियमपालनाची योग्य अंमलबजावणी झाल्यास केवळ कायदेशीर पूर्तता होत नाहीतर रुग्ण आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची खात्री मिळते. अग्निशमन विभागाच्या सहकार्याने घेतलेले हे प्रशिक्षण त्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे.

– डॉ. लक्ष्मण गोफणेआरोग्य वैद्यकीय अधिकारीपिंपरी चिंचवड महापालिका

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!