अधिकारी कर्मचाऱ्यांनी घेतली सद्भावना शपथ
शबनम न्यूज | प्रतिनिधी
“आम्ही अशी प्रतिज्ञा करतो की, आम्ही जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा विषयक भेद न करता सर्व भारतीय जनतेचे भावनिक ऐक्य आणि सामंजस्य यासाठी काम करू. आम्ही आणखी अशी प्रतिज्ञा करतो की आमच्यामधील सर्व प्रकारचे मतभेद आम्ही हिंसाचाराचा अवलंब न करता विचार विनिमय करुन व संविधानिक मार्गाने सोडवू.” अशी सद्भावनेची शपथ अधिकारी, व कर्मचाऱ्यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत घेऊन एकात्मतेचा निर्धार केला.
माजी पंतप्रधान भारतरत्न दिवंगत राजीव गांधी यांचा जन्मदिवस हा सद्भावना दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. आज त्यांच्या जयंतीनिमित पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले.
महापालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम यांनी पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी नगररचना विभागाचे उपसंचालक किशोर गोखले, सह शहर अभियंता बापू गायकवाड, उप आयुक्त राजेश आगळे, अण्णा बोदडे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच महानगरपालिकेच्या विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी सद्भावना शपथेचे वाचन केले.