spot_img
spot_img
spot_img

राज्यातील बहुतांश भागात आज पासून पावसाचा जोर ओसरणार

शबनम न्यूज | प्रतिनिधी

मध्य भारतावर एका कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून मुंबई महानगरासह राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. मात्र राज्यातील बहुतांश भागात आज  20 ऑगस्ट पासून पावसाचा जोर ओसरणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांच्या तुलनेत आज 20 तारखेला कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात पावसाचा जोर कमी होईल, परंतु काही ठिकाणी मुसळधार पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे. 19 तारखेच्या तुलनेत आज 20 तारखेला मुंबई शहरासह मुंबई महानगरातील इतर भागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहील. मात्र आज दुपार पर्यंत काही मध्यम ते जोरदार पावसाच्या सरींची शक्यता आहे, आणि त्यानंतर पाऊस अजून ओसरेल. आज सर्वात अधिक पाऊस पालघर जिल्हा (प्रामुख्याने उत्तर भाग) आणि नाशिक जिल्ह्यातील घाट परिसरात पडण्याची शक्यता आहे. राज्यातील बहुतांश भागात मात्र आज 20 ऑगस्ट पासूनच पावसाचा जोर ओसरेल.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!