spot_img
spot_img
spot_img

गणेशोत्सवासाठी ऑनलाईन पध्दतीने परवानगी सुविधा उपलब्ध

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महानगरपालिका व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमाने महानगरपालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फत शहरातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळेगृहनिर्माण संस्था यांना गणपती उत्सवासाठी दिल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या परवानग्या ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्याची सुविधा तयार करण्यात आली आहेसदर ऑनलाईन सुविधेचं हे सलग तिसरे वर्ष आहेया सुविधेअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील तसेच मनपाच्या कार्यक्षेत्राबाहेरील मात्र पिंपरी चिंचवड पोलीस यांच्या क्षेत्रातील सर्व सार्वजनिक मंडळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतातदेहूआळंदीदेहूरोड कॅन्टोन्मेंटशिरगावपरंदवाडीतळेगाव इत्यादी सर्व पोलीस ठाण्यांच्या अंतर्गत येणारा परिसर व त्या परिसरातील सार्वजनिक मंडळे या सुविधेचा लाभ घेऊ शकतात.

सदर प्रक्रियेतंर्गत मंडळातील सभासदाने स्वतःचे खाते महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर www.pcmcindia.gov.in  उपलब्ध असलेल्या गणेश उत्सव मंडप परवानगी 2025 या लिंक वर तयार करणे करणे आवश्यक आहेसदर खाते तयार करताना मोबाईल ओटीपी द्वारे खात्यावरील मोबाईल नंबरची नोंद घेतली जाईलप्रथमता मंडळ हे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील आहे अथवा नाही हे नोंदवणे आवश्यक आहे जेणेकरून त्या त्या प्रकारचे आवश्यक कागदपत्रे यांची मागणी संगणक प्रणाली मार्फत केली जाऊ शकतेमनपाच्या अग व ह क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत नोंदणी केली जाणार आहेसंबंधित क्षेत्रीय कार्यालयाचे स्थापत्य विभाग सर्वप्रथम ना हरकत दाखला देईलव त्यानंतरच संगणक प्रणाली अंतिम दाखला मंडळांना ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देणार आहे.

महानगरपालिकेकडून ना हरकत दाखला मिळाल्यानंतरच पोलीस आयुक्त कार्यालयाची प्रक्रिया सुरू होणार आहेज्या अर्जाना महानगरपालिका अंतिम ना हरकत दाखला देते तीच प्रकरणे ही पोलिसांकडे संगण संगणक प्रणाली द्वारे फॉरवर्ड केली जाणार आहेतमनपाच्या ना हरकत दाखल्यानंतर पोलिसांकडून संबंधित अर्ज ऑनलाईन पद्धतीने त्या त्या पोलिस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या वाहतूक विभागाकडे वर्ग केला जाणार आहेवाहतूक विभागाच्या ना हरकत दाखल्यानंतर पोलीस कार्यालयाकडील अंतिम परवानगी मंडळास उपलब्ध होईलमनपाच्या कार्यक्षेत्रा बाहेरील सर्व गणेश मंडळांना अर्ज करताना प्रथमतः तेथील नगरपरिषदनगरपालिकाग्रामपंचायती यांकडील ना हरकत दाखला मिळवणे आवश्यक आहेअर्ज करताना मंडळाने अध्यक्षअध्यक्षसचिवखजिनदार यांचे छायाचित्रमोबाईल क्रमांक तसेच देखाव्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध सुविधांची माहिती संगणक प्रणालीमध्ये पुरविणे आवश्यक आहेगणेश स्थापना व तसेच गणेश विसर्जन मिरवणूक यांच्या मार्गाची नोंद करणे तसेच त्यामध्ये वापरली जाणाऱ्या वाहनांची संख्यादेखावाविद्युत रोषणाई इत्यादींची माहिती देखील नोंदविणे क्रमप्राप्त आहेमनपाच्या भूमी व जिंदगी विभागामार्फत देण्यात येणारी ही सुविधा सर्व सार्वजनिक गणेश मंडळास विनाशुल्क पद्धतीने उपलब्ध असणार आहे.

पोलीस आयुक्त कार्यालय व महानगरपालिका यांच्या एकत्रित संकल्पनेतून ही संगणक प्रणाली बनवण्यात आली असून मंडळांना कमीत कमी वेळेमध्ये दोन्ही कार्यालयाकडील ना हरकत दाखले लवकरात लवकर उपलब्ध उपलब्ध व्हावेतमंडळांना कोठेही सरकारी कार्यालयांमध्ये चकरा मारावयास लागू नयेत या प्रमुख उद्देशाने ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहेतरीही जास्तीत जास्त सार्वजनिक गणेश मंडळे व गृहनिर्माण संस्था यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे मी आपल्या सर्वांना आवाहन करतो.

– शेखर सिंह,आयुक्त, प्रशासक तथा मनपा आयुक्त

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने कायमच ऑनलाईन सेवा सुविधांमधे नवनवीन गोष्टींचा समावेश करण्याबाबत पुढाकार घेतलेला आहेगणपती मूर्ती विक्री संबंधीची जे स्टॉल आहेत त्यावर शाडू माती की प्लास्ट्रर ऑफ पॅरिस कोणत्या प्रकारची मूर्ती विक्री होणार आहे याची देखील माहिती महानगरपालिकेला या माध्य‌मातून मिळणार आहे

-निळकंठ पोमण, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी

 

गणपती मूर्ती विक्री करणाऱ्या विक्रेत्यांची ऑनलाइन पद्धतीने नोंद घेणे..

गणपती मूर्ती विक्री करण्यास महानगरपालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयातून विक्रेत्यांना ना हरकत दाखला दिला जातोगणेश विक्री करणारे स्टॉल हे शहरातील विविध भागांमध्ये खाजगी तसेच सार्वजनिक जागेत उभारले जातातसदर सुविधा ही आजपासून ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आली आहे सदर सेवेस आवश्यक कागदपत्रे व ना हरकत दाखल्याचे शुल्क हे अर्ज करताना ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून सर्व विक्रेत्यांना नोंदणी करणे आवश्यक आहेसदर ना हरकत दाखल्यावर क्यूआर कोड असल्याने महानगरपालिकेच्या अधिका-यास अर्जाची सत्यता पडताळण्यास मदत होणार आहे.

 

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!