शबनम न्यूज | प्रतिनिधी
इंद्रायणी युवा प्रतिष्ठान आयोजित भव्य दहीहंडी उत्सव २०२५ मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा झाला. (दि. १६ ऑगस्ट २०२५) रोजी वार शनिवार इंद्रायणी नगर भोसरी येथे इंद्रायणी युवा प्रतिष्ठान वतीने दहीहंडी उत्सव आयोजित करण्यात आला होता. हजारो च्या संख्येने गोपाळ भक्तांनी या सार्वजनिक उत्सवाला हजेरी लावली तसेच उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी प्रमुख आकर्षण म्हणून अभिनेत्री त्रिधा चौधरी ( फेम – आश्रम, द चार्जशीट, बंदिश बॅडिट्स ) व अभिनेत्री जिया शंकर ( फेम – वेड, बिगबॉस हिंदी, ओटीटी २०२३) यांनी हजेरी लावली.
याप्रसंगी सचिन भैय्या लांडगे (कामगार नेते), अजित दामोदर गव्हाणे (मा. नगरसेवक), शामजी अगरवाल (उद्योजक), सुलभा ताई उबाळे ( उपगट नेत्या – शिवसेना शिंदे गट), रवी भाऊ लांडगे (बिनविरोध नगरसेवक), सीमा ताई सावळे ( मा. नगरसेविका), विलास मडीगेरी (मा. नगरसेवक) आदी मान्यवर उपस्थित होते.
दहीहंडी फोडण्याचा मान झित्राई देवी गोविंदा पथक चाकण, झित्राई मळा संस्थापक अध्यक्ष श्री सत्यवान बनकर यांना मिळाला.