गुढीपाडवा म्हणजे हिंदू धर्मात नवीन वर्षाची सुरुवात या निमित्ताने चिंचवड मध्ये भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर शोभायात्रा श्री दत्त मंदिर श्रीधर नगर येथून सुरू होणार असून माणिक कॉलनी चौक, सावरकर मार्ग लिंक रोड, कालिका माता मंदिर, शिवाजी उदय मंडळ, पोद्दार शाळा, विवेक वसाहत चौक, केशवनगर शाळा, साई मंदिर, विठ्ठल रखुमाई मंदिर, जुना पावर हाऊस चौक, गांधी पेठ ज्ञानेश्वर मंडळापासून मोरया समाधी मंदिराच्या मार्गे तर या शोभायात्रेची सांगतात श्री धनेश्वर मंदिर चिंचवड येथे होणार असून यावेळी महाआरती व प्रसादाचे वाटपही करण्यात येणार आहे.
या शोभा यात्रेत सर्व हिंदुहृदयी बंधू भगिनी यांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन माजी नगरसेवक तथा भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस शीतल उर्फ विजय गोरख शिंदे यांनी केले आहे.