15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन या निमित्ताने पिंपरी चिंचवड शहरातील कमला नेहरू शाळा संकुल पिंपरी नगर येथे ध्वजारोहण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी शहराचे माजी उपमहापौर डब्बू आसवानी , माजी नगरसेविका निकिता कदम प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांनी कवायत व संचलन प्रात्यक्षिक केले याप्रसंगी शाळा परिसरात आकर्षक रांगोळी काढण्यात आली .तसेच विद्यार्थ्यांची कवायत संचलनात प्रवीण बोरकर सर यांचे मार्गदर्शन लाभले मुख्याध्यापक प्रकाश गायकवाड उपप्राचार्य, सौ शोभा यांच्यासह मनसेचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रदेश सदस्य राजू भालेराव प्रामुख्याने उपस्थित होते .विद्यार्थ्यांना स्वच्छ ते विषयीचे मार्गदर्शन व ध्वज आणि स्वातंत्र्य दिना संबंधित माहिती मुख्याध्यापक यांच्या वतीने देण्यात आली .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमलता मावडी यांनी केले तर मंच सजावट सरस्वती कावडे यांनी केले तसेच रांगोळी व फलक सजावट चौक कृतिका जोगदंड व गहिरे हरिश्चंद्र यांनी केले
तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ हेमलता मावडी यांनी केले