शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूल येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. विजय पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, यावेळी विद्यार्थ्यांनी मानवंदना दिली.
यावेळी प्राचार्या डॉ. बिंदू सैनी, उपप्राचार्या पद्मावती बंडा, मुख्याध्यापिका शुभांगी कुलकर्णी, प्रशासकीय व्यवस्थापक मनीष ढेकळे, विभाग समन्वयक दर्शना कामत, सुश्री पृथा वैद्य, वंदना सांगळे, अर्चना प्रभुणे, नयना तारू, सुप्रिया नितीन व सर्व विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, पालक शिक्षक संघटनेचे सदस्य उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, प्राचार्य डॉ. बिंदू सैनी यांनी सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
सूत्रसंचालन भार्गवी वडणेरकर आणि अन्वी काळे हिने केले. अर्णव बाबर, आर्यन यादव, गौरवी मौका या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याचे महत्त्व सांगणारी भाषणे केली.
विद्यार्थी प्रतिनिधी नील भुजबळ याने पाहुण्यांची ओळख आणि सई घारगे हिने आभार मानले.