आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते सभागृह व ओपन स्पेस विकासकामांचा लोकार्पण सोहळा संपन्न
शबनम न्यूज : प्रतिनिधी
तळेगाव दाभाडे येथील विद्याविहार कॉलनीमध्ये आज ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भव्य आणि उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजारोहण सोहळा पार पडला. सुभेदार श्री. विष्णूजी पठाडे यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वज फडकावण्यात आला. देशभक्तीपर गीतांच्या निनादात, “भारत माता की जय”च्या घोषणा देत नागरिकांनी या ऐतिहासिक दिवसाचा आनंद साजरा केला.

स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने विद्याविहार कॉलनीत सभागृह व ओपन स्पेस विकासकामांचा लोकार्पण सोहळाही पार पडला. लोकहिताच्या दृष्टीने राबविण्यात आलेल्या या विकास प्रकल्पांसाठी एकूण १ कोटी १५ लाख ८० हजार रुपयांचा निधी वापरण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील नागरिकांना सुशोभित आणि सुसज्ज पायाभूत सुविधा, व्यायामासाठी आधुनिक साधनसामग्री तसेच मुलांसाठी सुरक्षित खेळण्याची जागा उपलब्ध होणार आहे.
या प्रकल्पांतर्गत यशस्वीरीत्या पूर्ण झालेली कामे पुढीलप्रमाणे —
•ओपन स्पेसचे सुशोभीकरण व विकास
•सभागृहाचे बांधकाम
•ओपन स्पेसला चेनलिंक कंपाउंड बसविणे
•पादचारी मार्गाची उभारणी
•डेकोरेटिव्ह लाइट पोलची बसवणूक
•ओपन जिम साहित्याची उभारणी
•लहान मुलांसाठी नवीन खेळणी बसविणे व जुनी खेळणी दुरुस्त करणे
या लोकार्पण सोहळ्यास आणि स्वातंत्र्य दिन कार्यक्रमास श्री. गणेशभाऊ खांडगे, श्री. कृष्णाजी कारके, श्री. सुरेश धोत्रे, श्री. विजयकुमार सरनाईक, श्री. गणेश काकडे, श्री. बजरंग जाधव, सौ. शैलजाताई काळोखे, श्री. सुदर्शनजी खांडगे, श्री. रामभाऊ गवारे, श्री. सुरेशभाऊ गायकवाड, श्री. सुहास गरुड, श्री. संजय चव्हाण, श्री. चंद्रकांत दाभाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात भाषण करताना मान्यवरांनी परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक केले. नागरिकांच्या सहकार्याने आणि स्थानिक नेतृत्वाच्या प्रयत्नांमुळे अशा प्रकारची उपयुक्त व दर्जेदार कामे यशस्वी होऊ शकतात, असे मत त्यांनी व्यक्त केले.
ध्वजारोहण व लोकार्पण सोहळ्याच्या यशस्वी आयोजनामुळे परिसरात उत्साहाचे व देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले. उपस्थितांनी परस्परांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत कार्यक्रमाची सांगता केली.