पिंपरी चिंचवड शहरातील किवळे परिसरातील के विले – श्रीनगर – बापदेव नगर हा रस्ता तात्काळ दुरुस्त करावा अशी मागणी राष्ट्रवादी पक्षाचे चिंचवड विधानसभेचे उपाध्यक्ष बापू कातळे यांनी ब प्रभाग कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली आहे.
बापू कातळे यांनी निवेदनात नमूद केले आहे की के विले – श्रीनगर – बापदेव नगर या मुख्य रस्त्यावर गेल्या काही दिवसापासून ड्रेनेजचे काम सुरू आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत, तसेच रस्त्यांची दुरावस्था मोठ्या प्रमाणात झाली आहे. वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत असून दररोज छोटे मोठे अपघात होत आहेत, पावसाळ्यात या रस्त्यावर पाणी साचून रस्त्याची परिस्थिती अधिकच गंभीर होत असते, या भागात रहदारी मोठ्या प्रमाणात आहे स्थानिक नागरिक, शालेय विद्यार्थी, तसेच सार्वजनिक ,खाजगी वाहने मोठ्या प्रमाणात या रस्त्यावर असतात. सध्याची रस्त्याची जी अवस्था आहे ती नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करते ,यामुळे तात्काळ सदर रस्त्याची दुरुस्ती करावी, खड्डे बुजवावे व पक्के डांबरीकरण करावे अशी मागणी बापू कातळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.