वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर ‘छावा’ चित्रपटाच्या भव्य उत्सवानिमित्त अलिकडेच झालेल्या ‘स्टार गोल्ड’ राउंडटेबल दरम्यान, छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे अभिनेते विकी कौशल, दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर, महाराणी सोयराबाईंची भूमिका साकारणाऱ्या दिव्या दत्ता आणि कवी कलशची भूमिका साकारणारे विनीत सिंग कुमार यांच्यासह चित्रपटाच्या टीमने काही गप्पांचा सेशन घेतला. या गप्पांनी प्रेक्षकांमध्ये ‘छावा’च्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरची उत्सुकता वाढवून ठेवली.
या गप्पांदरम्यान, विकी कौशलने दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांची गंमत केली. कटिंग रुमच्या मजल्यावर संपलेल्या दृश्यांबद्दल बोलत विकीने उतेकरांना चिडवले. राउंडटेबल दरम्यानच ही चित्रपटातील डिलीट केलेली दृश्ये ‘स्टार गोल्ड’वर वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरच्या वेळेस पाहता येतील असेही विकीने हसून सुचवले. त्यामुळे चित्रपट प्रदर्शनावेळी ही न पाहिलेली दृश्ये पुन्हा एकदा पाहायला मिळणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढली आहे.
या खेळकर संवादामुळे ‘स्टार गोल्ड’वर चित्रपटाच्या जागतिक टेलिव्हिजन प्रीमियरची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये द्विगुणित झाली आहे. या स्वातंत्र्यदिनाच्या आठवड्याच्या शेवटी ‘स्टार गोल्ड’वरील ‘छावा’च्या गर्जनेची साक्ष व्हा. १७ ऑगस्ट, रविवारी ८ वाजता – धैर्य, बलिदान आणि छत्रपती संभाजी महाराज यांची महाकाव्य कथा.