अभिनेत्री श्रिया सरण, सायली संजीव व आयेशा खान यांची प्रमुख उपस्थिती
शबनम न्यूज | प्रतिनिधी
सालाबाद प्रमाणे यंदाही संदीप वाघेरे युवा मंचच्या वतीने भव्य व जल्लोषात दहीहंडी उत्सवाचे आयोजन शनिवार दिनांक १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत करण्यात आले आहे. या उत्सवाची यंदाची खासियत म्हणजे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील तिन्ही झगमगत्या अभिनेत्रींची उपस्थिती – श्रिया सरण, सायली संजीव व आयेशा खान – या उत्सवाला विशेष आकर्षण ठरणार आहे.*
या विषयी अधिक माहिती देताना वाघेरे म्हणाले कि,दहीहंडीचा हा उत्सव प्रत्येक वर्षी प्रचंड उत्साहात आणि सांस्कृतिक वैविध्याने साजरा केला जातो. युवकांचा सहभाग, पारंपरिक गोविंदा पथकांचे थरारक सादरीकरण आणि विविध मनोरंजन कार्यक्रमांमुळे हा उत्सव पिंपरी-चिंचवड परिसरातील नागरिकांसाठी पर्वणी ठरतो.
संदीप वाघेरे युवा मंच ही संस्था सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडाक्षेत्रात सक्रीय असून, युवकांना एकत्र आणत समाजोपयोगी उपक्रम राबवते. या वर्षीच्या दहीहंडी उत्सवासाठी विशेष प्रकाशयोजना, लाईव्ह म्युझिक, महिला व कुटुंबीयांसाठी सुरक्षिततेची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
या कार्यक्रमास राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून, विशेषतः श्रिया सरण, सायली संजीव आणि आयेशा खान यांचे आगमन हा एक प्रमुख आकर्षणबिंदू ठरणार आहे.
या भव्य आयोजनासाठी संदीप वाघेरे व त्यांच्या युवा मंचच्या सदस्यांचे मोठे योगदान असून, संपूर्ण पिंपरी-चिंचवडकरांना या उत्सवाला उपस्थित राहण्याचे आवाहन वाघेरे यांच्या वतीने करण्यात आले आहे.