शबनम न्यूज | प्रतिनिधी
स्वातंत्र्यदिन (१५ ऑगस्ट) आणि त्यानंतर येणाऱ्या शनिवार-रविवारच्या सलग सुट्ट्यांमुळे एमआयडीसी परिसरात अनेक कंपन्या व उद्योग बंद राहणार आहेत. अशा काळात चोरी, कंपन्यांमध्ये सामूहिक चोऱ्या एमआयडीसी परिसरात दारुड्यांचा मुक्त वावर किंवा अन्य गैरप्रकार होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे एमआयडीसी परिसरातील उद्योग व कंपन्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त वाढविण्याची मागणी फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी केली आहे.
भोर यांनी सांगितले की, “सुट्टीच्या काळात अनेक कंपन्यांमध्ये उत्पादन व मनुष्यबळ कमी असल्यामुळे सुरक्षेची जोखीम वाढते. आणि सलग तीन दिवस सुट्ट्यांचा फायदा घेऊन अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक परिसरामध्ये फिरत असतात यासाठी दिवसा आणि रात्री पोलिसांनी गस्त वाढवावी, संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त पोलीस तैनात करावेत व रात्रीच्या वेळी विशेष पथक कार्यरत ठेवावे.”
या संदर्भात त्यांनी संबंधित पोलीस स्टेशन ने योग्य ती खबरदारी आवाहन संबंधित पोलीस स्टेशन आणि प्रसिद्धी पत्राद्वारे केले आहे, जेणेकरून उद्योग परिसर सुरक्षित राहील व कोणत्याही प्रकारची चोरी किंवा तोडफोड होणार नाही.