कुशल मनुष्यबळ तयार झाले तर जीडीपीत होईल वाढ – मुदित मित्तल
शबनम न्यूज | प्रतिनिधी
अभियांत्रिकी मधील तांत्रिक शिक्षण तसेच उद्योगाला सद्य परिस्थितीत व भविष्यकाळात आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ मिळाले तर उद्योगांची भरभराट होईल. त्यामुळे देशाच्या जीडीपी मध्ये वाढ होऊन जास्त प्रमाणात रोजगार संधी उपलब्ध होतील. त्यासाठी औद्योगिक आस्थापना व शैक्षणिक संस्थांनी एकत्रित काम करणे आवश्यक आहे. यासाठी “मॉडेल बेस्ट सिस्टीम इंजीनियरिंग” सारखी परिषद (एमबीएसई) मार्गदर्शक ठरेल, असे मत इंटरनॅशनल कौन्सिल ऑन सिस्टीम इंजीनियरिंग इंडिया चे (आयएनसीओएसई) मुदित मित्तल यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट च्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग (पीसीसीओई) येथे एमबीएसई ही शिखर परिषद आयएनसीओएस इंडिया चॅप्टरच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली होती. यावेळी पीसीसीओई आणि आयएनसीओएसई यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. पीसीसीओईचे उपसंचालक डॉ. निळकंठ चोपडे आणि आयएनसीओएसई चे अध्यक्ष मुदित मित्तल यांनी करारावर स्वाक्षरी केली. यावेळी आयएनसीओएसई ग्लोबल डायरेक्टर डेव्हिड लॉग, सचिव स्तुती गुप्ता, पीसीसीओई अधिष्ठाता डॉ. नरेंद्र देवरे, अर्पिता श्रीवास्तव, संदीप गायकवाड, यतीन जयवंत तसेच सी. एस. आदिशेषा, ईटन कंपनीचे वरिष्ठ मुख्य अभियंता डॉ. रामकृष्णन रमण, भरतकुमार ओबीयो आदी उपस्थित होते. या दोन दिवसीय परिषदेमध्ये भारतातील आघाडीच्या औद्योगिक आस्थापना, शैक्षणिक संस्था मधील ३२० पेक्षा अधिक प्रतिनिधी सहभागी झाले होते.
पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग अधिष्ठाता डॉ. शितल कुमार रवंदळे, संचालक डॉ. प्रवीण काळे, ग्लोबल बोर्ड ऑफ डायरेक्टर्स सचिव तुती गुप्ता, इनकोस इंडियाचे अध्यक्ष मोदीत मित्तल, ग्लोबल डायरेक्टर फॉर स्ट्रॅटेजिक इंटिग्रेशन डेविड लॉन्ग, कॉलीन्स सिस्टम्स एरोस्पेसचे वरिष्ठ तंत्रज्ञान संचालक सी. एस. आदीशेषा, सिस्टम्स इंजीनियरिंगचे वरिष्ठ मुख्य अभियंता डॉ. रामकृष्णन रमन, युएसए चे भरत कुमार बालाजी ऑबीओ, एचसीएल टेक्नॉलॉजी लिमिटेड कॉन्फरन्स चेअर आणि इंटरप्राईज आर्किटेक्ट डॉ. निखिल जोशी, पीसीसीओई संशोधन आणि विकास विभाग प्रमुख डॉ. नरेंद्र देवरे आदी उपस्थित होते.
या सत्रातील पॅनल चर्चेत फिलिप्स हेल्थकेअर शैलेश अग्रहारी, ब्लूकेई सोल्युशन्स मुदित मित्तल, कॉलीन्स एरोस्पेस प्रसन्ना राममूर्ती, डेसॉल्ट सिस्टिम्सचे किरण जेकब, इंटरकॅक्स डॉ. मानस बजाज या उद्योग तज्ज्ञांचा तसेच बोईंगचे डॉ. योगानंद जेप्पू, महिंद्रा विद्यापीठ देवानंदम हेन्री, टाटा मोटर्स डॉ. रंगा गुंटी, पीसीसीओई डॉ. अमृता फ्रान्सिस, फिलिप्स आरोग्य सेवा तमिळ सेल्वन एस. या शैक्षणिक तज्ज्ञांचा समावेश होता.
डॉ. अमृता फ्रान्सिस यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. तसेच फिलिप्स लीड सिस्टीम इंजिनियर शरद रायगुरु, सिस्टीम इंजीनियरिंग फॅकल्टी टीम डॉ. एन. विवेकानंदन, डॉ. उपेंद्र मौर्य, अतुल काशीद, ईशान साथोने आणि मेकॅनिकल विभागाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
सूत्रसंचालन नेहा तिवारी, अपर्णा कंसल यांनी केले. डॉ. अमृता फ्रान्सिस यांनी आभार मानले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.