शबनम न्यूज | प्रतिनिधी
खेड तालुक्यातील पाईट जवळील प्रसिद्ध कुंडेश्वर देवस्थान येथे श्रावण महीन्यात भाविक मोठ्या प्रमाणात देव दर्शनासाठी येतात. श्रावणी सोमवार निमित्त पाईट जवळील पापळवाडी मधील जळवपास ३२ ते ३५ महिला भाविक पिकअप गाडीतून दर्शन करुन परत येत असताना उतारावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला व गाडी दरीत कोसळली. यात जावपास ९ ते १० भावीक मृत झाल्या असून उर्वरित भावीक गंभीर जखमी झाले आहेत व त्यांच्यावर हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु आहेत.
या दुर्घटनेत मृत्युमुखी भाविकांना भाजपा चिंचवड काळेवाडी पदाधिकाऱ्यांच्या वतीने चिंचवड गावातील क्रांतिवीर चापेकर चौक येथे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच जखमी भाविकांना लवकर बरे होऊन दीर्घायुष्य लाभो अशी मोरया चरणी सामूहिक प्रार्थना करण्यात आली.
भाजपा पिंपरी चिंचवड शहर सचिव मधुकर बच्चे यांनी या श्रद्धांजली सभेत उपस्थितांना दुर्घटने समंधी सविस्तर माहिती दिली. अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या प्रसंगी भाजपा महाराष्ट्र प्रदेश सदस्य मोरेश्वर शेडगे, भाजपा महाराष्ट्र प्रदेश निमित्त सदस्य महेश कुलकर्णी, भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव अजित कुलथे, भाजपा ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष कैलास सानप, माजी नगरसेवक सुरेश भोईर,शहर सचिव मधुकर बच्चे, प्रभाग स्विकृत सदस्य विठ्ठल भोईर, चिंचवड काळेवाडी मंडल अध्यक्ष हर्षद नढे, शहर उपाध्यक्ष रविंद्र देशपांडे, रविंद्र प्रभुणे, पल्लवी पाठक यांच्यासह भाजपा पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच नागरिक उपस्थित होते.