spot_img
spot_img
spot_img

मोठी स्वप्ने पाहा, नव्या संधी शोधा – प्रल्हाद साळुंखे

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

शबनम न्यूज | प्रतिनिधी

औंध : “मोठी स्वप्ने पाहा, नव्या संधी शोधा, आणि संपूर्ण जगाला दाखवून द्या की, ग्रॅज्युएशनचा सर्टिफिकेट फक्त कागदाचा तुकडा नाही, तर यशाची सुरुवात आहे,” असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे माजी मुख्य अभियंता प्रल्हाद साळुंखे यांनी केले. ते रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. सदर कार्यक्रम रोटरी क्लब ऑफ औंधचे प्रेसिडेंट राजेंद्र शेलार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण आंधळे, उपप्राचार्य डॉ. प्रभंजन चव्हाण, प्रा.डॉ. तानाजी हातेकर, प्रा. सुशील कुमार गुजर, डॉ. रेश्मा दिवेकर, माजी उपप्राचार्य रमेश रणदिवे, प्रा. सौरभ कदम, प्रा. सविता पाटील, प्रा. कल्पना कांबळे, प्रा. स्वाती चव्हाण आदी महाविद्यालयाचे शिक्षक-शिक्षिका, माजी विद्यार्थी, पत्रकार गजाला सय्यद, विद्यार्थी परिषद अध्यक्ष साक्षी खवळे, दीपाली पुजारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

पुढे बोलताना साळुंखे म्हणाले कि, तुम्ही आता शिक्षणाचा एक टप्पा पूर्ण केला आहे. पण हे “The End” नाही, तर “To be continued…” आहे! “ज्या दिवशी तुम्ही शिकणं थांबवाल, त्या दिवशी वाढणं थांबेल!” “शिकणे थांबवू नका, कारण आयुष्यभर शिकणारेच पुढे जातात!” तुम्ही या संस्थेचा कणा आहात. तुमच्या समर्पणाने, कौशल्याने आणि उत्कटतेने या तरुण मनांना आकार दिला आहे आणि आमची प्रतिष्ठा उत्कृष्टतेचे केंद्र म्हणून उंचावली आहे. आज आपण जे यश साजरे करत आहोत, मग ते शैक्षणिक सन्मान असो, संशोधनातील यश असो किंवा वैयक्तिक वाढ, हे तुमच्या अथक प्रयत्नांचे प्रमाण आहे. आम्ही करिअर विकासाला प्रोत्साहन देत असताना, आम्ही तुमच्यातही गुंतवणूक करतो,प्रशिक्षण, संशोधन अनुदान आणि उद्योग नेत्यांशी सहकार्याच्या संधींद्वारे. एकत्रितपणे, आपण फक्त करिअर घडवत नाही; आपण भविष्य घडवत आहोत.

ही संस्था केवळ शिक्षणाचे ठिकाण नाही,ती यशाची उडी आहे. विद्यार्थ्यांना मी म्हणेन: मोठी स्वप्ने पाहा, कठोर परिश्रम करा आणि ही तुमच्या महानतेची पायरी बनू द्या. प्राध्यापकांना मी म्हणेन: प्रेरणा देत रहा, नवकल्पना करत रहा आणि नेतृत्व करत रहा. एकत्रितपणे, आपण या उत्कृष्टतेचा वारसा निर्माण करूया जो या भिंतींपलीकडेही गूंजेल.

पुढे शेलार यांनी अध्यक्षीय भाषणात म्हंटले कि, विद्यार्थ्यांनी आपले शहर प्रदूषण मुक्त करण्यासाठी स्वतःपासून सुरुवात करायला हवी, एक जबाबदारी घायला हवी आहे. यासाठी आम्ही रोटरी क्लबच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवित असतो, त्याकरिता विद्यार्थिनी देखील स्वतः सहभागी होऊन जबाबदारी पार पडायला हवी. तसेच या महाविद्यालयाचे विद्यार्थी नक्कीच गुणी आहेतच त्याचप्रमाणात विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात पुढे यायला हवे, रोटरी क्लबच्या माध्यमातून त्यांना सहकार्य नेहमीच करण्यात येईल.

यावेळी प्राचार्य आंधळे यांनी साळूंखे यांच्या कार्याचे कौतुक करत महाविद्यालयाला त्यांच्या मार्फत होणाऱ्या सहकार्याची माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, एकूण ६०० प्रमाणपत्र आज वाटप होत आहे. त्यासोबतच विविध पारितोषिके प्रदान करण्यात येत आहे. महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक आहे. आज ज्यांना पारितोषिके प्राप्त होणार आहे आणि जे सहभागी झाले आहेत अशा विद्यार्थ्यांचे अभिनंदन आहे.

सदर समारंभात शैक्षणिक पारितोषिक वाचन प्रा. सुशील गुजर यांनी केले तर सांस्कृतिक पारितोषिक वाचन डॉ. रेश्मा दिवेकर यांनी केले तसेच क्रीडा पारितोषिक वाचन प्रा. सौरभ कदम यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सायली गोसावी यांनी केले तर आभार प्रभंजन चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!