सांगवी:- युवक ही समाजाची सामजिक शक्ती आहे.समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी या शक्तीतील सकारात्मक ऊर्जेचा उपयोग समाज जडणघडणीसाठी होणे आवश्यक आहे. युवकांची फार मोठी संख्या आपल्याकडे आहे, ही जमेची बाजू आहे.
युवकांनी समाजातील विविध प्रश्नांबद्दल जागरुक राहणे त्यामुळे आवश्यक ठरते. अलीकडच्या काळात युवकांची मानसिकता बदलत चालली आहे.ती अधिकाधिक नकारात्मक गोष्टींकडे वळत आहे. आधुनिक तंत्रज्ञानात करिअरच्या अनेक संधी उपलब्ध असताना सामाजिक व देशातील अन्य प्रश्नांकडे युवकांचे दुर्लक्ष होत असल्याचे प्रामुख्याने जाणवतेआहे.युवक ही मोठी शक्ती आहे. ही जर सार्वजनिक जीवनामध्ये झोकून देऊन काम करण्यास तयार झाली तर समाजात निश्चितपणाने मोठी क्रांती घडून बदल घडू शकतो. असे मत सातारा मित्र मंडळ सांगवी,नवी सांगवी ,पिंपळे गुरव आयोजित कै. सौ शकुंतलाबाई आनंदराव शितोळे प्राथमिक शाळा ,शिशु विहार व नूतन माध्यमिक विद्यालय सांगवी येथील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप कार्यक्रम प्रसंगी सातारा मित्र मंडळ सांगवी नवी सांगवी,पिंपळे गुरव चे अध्यक्ष व शाळेचे मुख्याध्यापक शिवाजीराव माने यांनी विचार व्यक्त केले. सातारा मित्र मंडळ सांगवी या मंडळाने आज या शाळेतील 75 गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना स्कूलबॅग व साहित्य वितरित केले ही फार अभिमानाची बाब आहे. हे मंडळ नेहमीच समाजातील गरजू पर्यंत तत्परतेने पोहचते व मदत करते.गेली 8 वर्ष मंडळाने अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले आहेत आणि गरजूंना मदत करत आहे तसेच हे मंडळ संपूर्ण महाराष्ट्रात समाजोपयोगी काम करत आहे असे ते म्हणाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव तुळशीराम नवले हे होते.
या कार्यक्रमप्रसंगी सातारा मित्र मंडळ सांगवी,नवी सांगवी,पिंपळे गुरव चे सचिव सोमनाथ कोरे, कार्याध्यक्ष संजय चव्हाण, सदस्य प्रकाश चव्हाण ,पांडुरंग सुतार , राहुल पवार
,किरण बागल , लक्ष्मण शिंदे
ओंकार भागवत ,रामदास सैंदाणे ,शिवराज शिंदे ,वैभव राऊत,छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार श्री रामभाऊ खोडदे, उपाध्यक्ष संजीव वाळके, सदस्य श्री प्रकाश ढोरे,जयप्रकाश जंगले, माध्यमिक प्रमुख शीतल शितोळे, इंग्रजी माध्यम प्रमुख शोभा वरठी,बालवाडी प्रमुख संगीता सुर्यवंशी, सर्व विध्यार्थी, शिक्षक, पालक मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक , निवेदन व आभार दत्तात्रय जगताप यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या सर्व शिक्षकांनी खुप परिश्रम घेतले.