बोपोडी, पुणे :-डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन प्रशाला, बोपोडी सर्व माजी विद्यार्थी संघ यांच्या विद्यमाने ब्र.कु. डॉ. त्रिवेणी दीदी बहिरट यांचा जाहीर नागरी सत्कार रविवार, दि. 10 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11:00 वा. होणार आहे. हा कार्यक्रम डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन प्रशाला, बोपोडी येथे आयोजित करण्यात आला आहे.
डॉ. त्रिवेणी दीदी बहीरट यांना कॅनेडी युनिव्हर्सिटी तर्फे ऊेलीेीं ेष झहळश्रेीेहिू ळप डळिीर्ळीींरश्र डलळशपलश ही मानद पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचा नागरी सत्कार करून गौरव करण्यात येणार आहे.डॉ. बहीरट यांचे शिक्षण आणि कार्यक्षेत्र विविध प्रकारचे आहे. त्यांनी काउंसिलिंग, स्पिरिच्युअल हेल्थ, अल्टरनेटिव्ह मेडिसिन, मॅग्निफाइड हीलिंग, सुजोक थेरपी अशा अनेक विषयांमध्ये उच्च शिक्षण व प्रशिक्षण घेतले आहे. तसेच अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय संस्थांकडून सन्मान प्राप्त केले आहेत.या कार्यक्रमास माजी विद्यार्थी संघाचे पदाधिकारी, मान्यवर नागरिक आणि गावातील प्रतिष्ठित व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. आयोजकांनी सर्वांना कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.