spot_img
spot_img
spot_img

राष्ट्रवादी च्या आंदोलनावर आपचा हल्लाबोल

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सुधारित प्रारूप विकास आराखडा (DP Plan) संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित करण्यात आलेला मोर्चा हा केवळ जनतेची दिशाभूल करणारा आणि राजकीय नौटंकीचा प्रकार असल्याची टीका आम आदमी पक्षाचे शहारध्यक्ष रविराज काळे यांनी केली आहे.

ते म्हणाले, दोन महिने शांत झोप काढल्यानंतर आता महापालिका निवडणुका जवळ आल्यावर अचानक जाग येणे, ही केवळ नौटंकी नव्हे तर राजकीय संधीसाधूपणाचं उत्तम उदाहरण आहे. नकली आक्रोश करून महायुतीवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असलेले हे नेते, याआधी जनतेच्या प्रश्नांवर गप्प का होते. डीपी आराखड्याच्या ६० दिवसांत एकही निवेदन नाही, एकही बैठक नाही, आणि आता अचानक रस्त्यावर मोर्चा – ही लोकांच्या बुद्धीची परीक्षा आहे की त्यांची समजूत काढण्याचा विनोदी प्रयत्न? असा प्रश्न उपस्थित होतो.

राष्ट्रवादी नाटक करतेय, आणि महायुती डायलॉगबाजी – शहराच्या गरजा यांना आठवत नाहीत. जनतेला याचा कंटाळा आलाय. शहराच्या विकासावर महायुती सरकार राजकारण करताना दिसत आहेत. यात बळी पडतोय तो फक्त सामान्य नागरिक असे मत रविराज काळे यांनी व्यक्त केले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!