spot_img
spot_img
spot_img

पुणे जिल्ह्यात हिंजवडी, चाकणसह होणार तीन नवीन महापालिका! अजित पवार यांची घोषणा !

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पुणे जिल्ह्यात चाकण, हिंजवडी आणि उरळी देवाची-फुरसुंगी-मांजरी अशा तीन महापालिका केल्या जाणार आहेत, अशी मोठी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सकाळी केली. उपमुख्यमंत्री पवार शुक्रवारी सकाळी चाकण औद्योगिक क्षेत्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी चाकण औद्योगिक क्षेत्रातील नागरी समस्यांची पाहणी केली.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, चाकणमध्ये नगरपरिषद असून या ठिकाणी विकासाच्या विकासावर मर्यादा येत आहेत. याच बरोबर हिंजवडीतही औद्योगिक क्षेत्राच्या विकासाला बंधने येत आहेत. यामुळे चाकण, हिंजवडीला नवीन महापालिका केल्या जाणार आहेत. याचबरोबर उरळी देवाची-मांजरी-फुरसुंगसाठी नवीन महापालिका केली जाईल. कोणाला आवडो न आवडो या महापालिका होणारच आहेत.

हिंजवडी आयटी पार्क, चाकण औद्योगिक क्षेत्रातील नागरी समस्या वारंवार समोर येत आहेत. या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. या समस्यांवरून राज्य सरकारवर टीकेची झोड उठली आहे.यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या महिन्यापासून दर आठवड्याला आयटी पार्क आणि चाकण औद्योगिक क्षेत्राची पाहणी सुरू केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहाटेच चाकण औद्योगिक क्षेत्राची पाहणी केली. यावेळी त्यांनी औद्योग क्षेत्रातील वाहतूक कोंडीच्या समस्येचा आढावा घेतला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!