शबनम न्यूज | प्रतिनिधी
ज्येष्ठ नागरिक संघ, बिजलीनगर, चिंचवड येथे गुरुवार दिनांक ३१ जुलै रोजी ज्येष्ठांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम संघात संपन्न झाला.या वेळेस जुलै महिन्यात ज्या जेष्ठांचा वाढदिवस होता, त्यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे नियोजन ज्येष्ठ नागरिक संघ बिजलीनगर चे उपाध्यक्ष अशोक भंगाळे,सहकोषाध्यक्ष वाल्मीक शर्मा यांनी केले.
यावेळी संघाचे कार्याध्यक्ष जयवंत भोसले, सहकार्याध्यक्ष मनोहर कोळंबे, कोषाध्यक्ष मुरलीधर चोपडे,सहकोषाध्यक्ष वाल्मीक शर्मा ,कार्यकारणी सदस्य अनुराधा चैतन्य, आशा पाटील,सौ.वैशाली चिटणीस, दिलीप कांबळे उपस्थित होते.
या कार्यक्रमास शेखर बबनराव चिंचवडे, समाजसेवक तथा मा.पिं.चिं.भाजपा उपाध्यक्ष व दामोदर चिंचवडे (पाटील बुवा) महा.प्रदेश.भाजपा राज्य कार्यकारणी सदस्य ऊपस्थीत होते. शेखर चिंचवडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.या वाढदिवसाच्या कार्यक्रमास अल्पोपाहार शेखर चिंचवडे यांच्या वतीने करण्यात आला होता. सर्व ज्येष्ठांनी त्याचा आस्वाद घेतला.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अनुराधा चैतन्य यांनी केले.