spot_img
spot_img
spot_img

सेलिब्रिटीज साई बाबांच्या भक्तांसाठी जेवण बनवणार

शबनम न्यूज | प्रतिनिधी

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील सेलिब्रिटी मास्टर शेफचा आगामी एपिसोड भावनापूर्ण आणि आध्यात्मिक स्वादाने परिपूर्ण असणार आहे. या एपिसोडची सुरुवात हृदयस्पर्शी क्षणांनी होणार आहे. तेजस्वी प्रकाश आणि राजीव अदातिया यांनी आपण साई बाबांचे किती निःस्सीम भक्त आहोत हे सांगून या भागाची सुरुवात केली आणि त्यानंतर थेट शिर्डीतील साई बाबांच्या मंदिराला भेट देखील दिली. दर्शन करून सेटवर परतल्यावर तेजस्वीने सर्व परीक्षकांना आणि स्पर्धकांना प्रसाद दिला आणि मग सेटवर साई बाबांची पूजा करण्यात आली. हे झाल्यानंतर या शोमधल्या पुढील चॅलेंजचा भाग म्हणून स्पर्धकांना 500 पेक्षा जास्त साई भक्तांसाठी जेवण बनवायचा टास्क मिळाला.

राजीव स्वतः साई भक्त आहे. त्याने साई बाबांशी आपले किती दृढ नाते आहे याविषयी आणि या विशेष भागाविषयी सांगितले. तो म्हणतो, “माझे आईवडील मला नेहमी सांगत असत की, तू जर सच्चा भक्त असशील तर तुला हवे ते तू मिळवू शकशील. गेली 20 वर्षे मी साईंची भक्ती करत आहे. या किचनमध्ये साई भक्तांसाठी काम करताना मला मनातून खूप छान आणि कृतकृत्य वाटते आहे. तसे पाहिले तर हा आत्तापर्यंतचा आम्हाला मिळालेला सर्वात मोठा टास्क आहे. शेकडो लोकांसाठी आम्हा स्पर्धकांना जेवण बनवायचे आहे!” या पाक कलेच्या टास्कसाठी स्पर्धकांना दोन गटांत विभागण्यात आले. राजीव आणि तेजस्वी यांना या दोन गटांचे कर्णधार म्हणून नेमण्यात आले, ज्यात त्यांचे नेतृत्व पणाला लागले तेजस्वी म्हणते, “श्रद्धा मला ताकद देते. साई बाबांनी मला नेहमीच मार्गदर्शन केले आहे. मला मनापासून असे वाटते की, प्रेमाने आणि भक्तीने स्वयंपाक केला तर त्यात वेगळाच स्वाद येतो!” शिर्डीच्या मंदिरात जाऊन साई बाबांचा आशीर्वाद घेण्याचा अनुभव त्या दोघांसाठी खूप खास होता. त्यातून त्यांना आपल्या टीमचे नेतृत्व करून जिंकण्यासाठीचे बळ मिळाले.

त्यांची भक्ती, त्यांचे नेतृत्व आणि पाककलेतील कौशल्य या अवघड चॅलेंजमध्ये त्यांना विजय मिळवून देईल का? बघत रहा, सेलिब्रिटी मास्टरशेफ, सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन आणि सोनी लिव्हवर!

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!