शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहरातील घरकुल चिखली येथे श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या श्लोक प्रभात फेरीला 27 मार्च रोजी सकाळी सहा ते सात या वेळेत सुरुवात करण्यात आली प्रत्येक महिन्याच्या शिवरात्रीला सकाळी सहा ते सात या वेळेत ही प्रभात फेरी असणार आहे श्री हरिहर मंदिर श्रीराम सर्कल घरकुल चिखली पासून दरवेळी या प्रभात फेरीची सुरुवात होणार आहे. या प्रभात फेरीत घरकुल परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी तसेच श्रीराम व समर्थ भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
या प्रभात फेरीमध्ये श्री समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोकाचे उच्चारण केले जाते ही प्रभात फेरी काढण्याचा उद्देश म्हणजे सर्वांनीच दररोज सकाळी लवकर उठून श्री रामाचा जप करावा आणि आपल्या जीवनाचे कल्याण करून घ्यावे अशा प्रभात फेरीचे संपूर्ण महाराष्ट्रात आयोजन केले जाते.