spot_img
spot_img
spot_img

प्रभाग क्र. ११ मधील रस्ते तातडीने खड्डेमुक्त करा ; राष्ट्रीय खेळाडू अरुण पाडुळे यांची मागणी

शबनम न्यूज | प्रतिनिधी

शहरातील प्रभाग क्र. ११ मधील पूर्णानगर, शिवतेजनगर, कृष्णानगर, फुलेनगर, सेक्टर-20, घरकुल, नेवाळे वस्ती, अजंटानगर आणि भीमशक्ती नगर या भागांतील रस्त्यांची अत्यंत खराब अवस्था झाली असून, पावसामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. स्थानिक रस्ते पूर्णपणे खड्डेमय झाल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून, जेष्ठ नागरिक व लहान मुलांना विशेषतः याचा त्रास सहन करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय खेळाडू अरुण पाडुळे यांनी ‘फ’ क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे रस्ते तातडीने खड्डेमुक्त करण्याची मागणी केली आहे.

यावर प्रशासनाने तात्काळ दखल घेत, स्थापत्य संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. ‘फ’ क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील यांनी लवकरच प्रभागातील रस्ते खड्डेमुक्त करण्याचे आश्वासन दिले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ही मागणी महत्वाची असून, लवकरात लवकर प्रत्यक्ष काम सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!