वेदांत मोटर ड्रायव्हिंग स्कुला चा अभिनव उपक्रम
शबनम न्यूज | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, तथा बीड, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वेदांत मोटर ड्रायव्हिंग स्कूल पूर्णानगर येथे महिलांसाठी माफक दरात ड्रायव्हिंग ट्रेनिंग व लायसन्स वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाहतूक सेल व वेदांत ड्रायव्हिंग स्कूल यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आले होते.
वेदांत मोटर ड्रायव्हिंग स्कूलचा हा अभिनव उपक्रम महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरला आहे. या ट्रेनिंग मध्ये महिलांना घाट ड्रायव्हिंग ट्रेनिंग, नाईट ड्रायव्हिंग ट्रेनिंग, तसेच वाहनाबद्दल इतरही ट्रेनिंग दिले जाणार आहे. या कार्यक्रमात महिलांना लायसन्स वाटप करण्यात आले. तसेच नवीन महिलांसाठी गाडी चालवण्याच्या प्रशिक्षणाला सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला वर्ग व पुरुष उपस्थित होते.
गाडी चालकाच्या प्रशिक्षणाचा शुभारंभ राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मा.महापौर योगेश बहल, स्थायी समिती मा अध्यक्ष अजित भाऊ गव्हाणे ,ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे, महिला अध्यक्ष कविताताई आल्हाट, युवती अध्यक्ष वर्षाताई जगताप, कार्याध्यक्ष फजल भाई शेख, डॅनियल दळवी, रवींद्र ओव्हाळ, वाहतूक सेल कार्यअध्यक्ष अकबर भाई शेख, सामाजिक कार्यकर्त्या संगीताताई लोखंडे, वृषालीताई वरखडे, शिवलीला धूमसुरे, सामाजिक कार्यकर्ते संतोष क्षीरसागर, संतोष मायने, आप्पासाहेब दौंडे, नवनाथ लोखंडे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी वाहतूक सेल अध्यक्ष वेदांत मोटर ड्राइविंग स्कूल चे संचालक श्री.विनोद वरखडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राष्ट्रवादी पदवीधर सेल अध्यक्ष प्रदीप औटी. डॅनियल दळवी, भरत शेठ मोहोड संजयकुमार डोनापुरगे, तहल मातव, अभिजीत बापट, अमितदादा पवार यांनी परिश्रम घेतले.