spot_img
spot_img
spot_img

मातोश्री व रायरेश्वर माथाडी कामगार सहकारी पतसंस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा यशस्वीपणे संपन्न

शबनम न्यूज | प्रतिनिधी

आकुर्डी येथील खंडोबा सांस्कृतिक भवन येथे दिनांक ३ ऑगस्ट २०२५ रोजी, मातोश्री माथाडी कामगार सहकारी पतसंस्था मर्या. आणि रायरेश्वर माथाडी कामगार सहकारी पतसंस्था मर्या. या दोन्ही संस्थांची वार्षिक सर्वसाधारण सभा अत्यंत शिस्तबद्ध आणि यशस्वीपणे पार पडली.

रायरेश्वर पतसंस्थेचा ३२ वा अहवाल अध्यक्ष सतिश कंटाळे यांच्या अध्यक्षतेखाली सादर झाला. सदस्यसंख्या 1270 पर्यंत पोहोचलेली असून, संस्थेने खालील आर्थिक प्रगती साधली आहे:

वसूल भाग भांडवल: ₹7 कोटी 45 लाख

ठेवी: ₹2 कोटी 5 लाख

कर्जवाटप: ₹12 कोटी 35 लाख

स्वनिधी निधी: ₹2 कोटी 37 लाख

बँकेत गुंतवणूक: ₹3 कोटी 24 लाख

निव्वळ नफा: ₹1 कोटी 5 लाख

संचालक मंडळ (रायरेश्वर): श्रीकांत मोरे (उपाध्यक्ष), ज्ञानेश्वर घनवट (सचिव), रोहित नवले (खजिनदार), तसेच संचालक श्री. भिवाजी वाटेकर, शंकर निकम,  विजय खंडागळे, सुभाष पुजारी,  बाळू ओव्हाळ,  संदीप चोरे, श्री. गुलाब शिंदे आदी उपस्थित होते. 

मातोश्री पतसंस्थेचा 28 वा अहवाल अध्यक्ष पांडुरंग कदम यांच्या अध्यक्षतेखाली सादर झाला. सदस्यसंख्या 1444 पर्यंत पोहोचलेली असून, संस्थेने खालील आर्थिक प्रगती साधली आहे:

वसूल भाग भांडवल: ₹9 कोटी 70 लाख

ठेवी: ₹2 कोटी 34 लाख

कर्जवाटप: ₹17 कोटी 96 लाख

स्वनिधी निधी: ₹3 कोटी 53 लाख

बँकेत गुंतवणूक: ₹2 कोटी 98 लाख

निव्वळ नफा: ₹1 कोटी 32 लाख

संचालक मंडळ (मातोश्री ): पांडुरंग कदम (अध्यक्ष) बबन काळे (उपाध्यक्ष), उध्दव सरोदे (सचिव),  सर्जेराव कचरे (खजिनदार), तसेच संचालक गोरक्ष दुबाले,  बाबासाहेब पोते, अशोक साळुंके , विठ्ठल इंगळे ,  समर्थ नाईकवडे,  ज्ञानदेव पाचपुते ,  चंद्रकांत पिंगट, आदींनी उपस्थिति लावली. सभेच्या अध्यक्षस्थानी इरफानभाई सय्यद होते. प्रमुख पाहुणे म्हणून दिलीप देशमुख (अध्यक्ष: असोसिएशन ऑफ ट्रान्सपोर्ट, पुणे) तसेच महाराष्ट्र मजदूर संघटनेचे पदाधिकारी, सभासद कामगार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन:  सर्जेराव कचरे व अहवाल वाचन: प्रकाश पवार व धर्मराज कदम यांनी केले.

यावेळी बोलताना इरफान सय्यद म्हणाले की, दोन्ही पतसंस्थांनी कामगारांच्या आर्थिक आत्मनिर्भरतेचा मार्ग खुला केला आहे.सभासदसंख्या वाढ, ठेवी, स्वनिधी, गुंतवणूक आणि पारदर्शक कारभार हीच यशाची गुरुकिल्ली ठरली आहे. शिवसेनेचे धोरण कायम कामगारवर्गाच्या हिताचे राहील याची खात्री देतो.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!