एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चरला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक
शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचालित एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईनच्या विद्यार्थ्यांनी नाशिक महानगरपालिका आणि त्र्यंबक नगरपरिषदेद्वारे आयोजित “आपली गोदावरी रिव्हरफ्रंट अँड प्रिसिंक्ट डेव्हलपमेंट” या स्पर्धेत तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. नाशिक महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त ऐश्वर्या नायर यांच्या हस्ते विजयी संघातील विद्यार्थ्यांना दोन लाखांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
नाशिकच्या तपोवन क्षेत्रासाठीचा प्रकल्प प्रस्ताव, नदीच्या पर्यावरणाचे जतन करणे, शाश्वत पर्यटनाला प्रोत्साहन देणे, नैसर्गिक संसाधनाचा पुनर्वापर सक्षम करणे आणि सामाजिक उन्नतीला चालना देणे यावर एस. बी. पाटील आर्किटेक्चर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रकल्प सादर केला होता. या संघात इशिका नारखेडे, कृतिका कदम, निपुण कोसरे, तन्वी खोचरे, मृणाल जाधव, कुणाल कुंभार, श्रुतिका वेर्णेकर, आदित्री केंकरे आणि कादंबरी कुंभार यांनी सहभाग घेतला होता. आर्किटेक्ट नीलिमा भिडे, आर्किटेक्ट ऋतुजा माने, आर्किटेक्ट श्रीया कानडे यांनी मार्गदर्शन केले. या स्पर्धेसाठी २८२ प्रवेशिका आल्या होत्या.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, प्राचार्या डॉ. स्मिता सूर्यवंशी यांनी विजयी संघातील विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.