spot_img
spot_img
spot_img

आम आदमी पक्षाकडून झाडांची अंत्ययात्रा..!

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये वाढत्या अनधिकृत झाडतोडीमुळे शहराचा श्वास हिरावला जात आहे. एकामागून एक पडणारी झाडे ही केवळ हिरवाईची हानी नसून भविष्यातील प्रदूषण, कोरडी हवा आणि उष्णतेचा गंभीर इशारा आहे.

शहराच्या या पर्यावरणीय हानीविरोधात आवाज उठवत आम आदमी पार्टी, पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर तर्फे झाडांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. या आंदोलनातून निसर्गरक्षणासाठी लोकांचा जिव्हाळ्याचा हक्काचा आवाज उमटला. शहरातील पर्यावरणप्रेमी, सामाजिक संघटना आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून झाडतोडीविरोधातील निषेध नोंदवला.

आम आदमी पार्टी कडून हे स्पष्ट करण्यात आले की, शहरातील हिरवाई वाचवण्यासाठी स्थानिक प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत अन्यथा, हा जनआक्रोश आणखी तीव्र केला जाईल.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!